Thursday, June 12, 2025
Home टेलिव्हिजन एकावं ते नवलंच! उर्फीने केला माेठा खुलासा; म्हणाली, ‘बाेल्ड सीनवर मनाई केली अन्…’

एकावं ते नवलंच! उर्फीने केला माेठा खुलासा; म्हणाली, ‘बाेल्ड सीनवर मनाई केली अन्…’

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद  तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्राेलिंगचा ही सामना करावा लागताे. अलीकडेच उर्फीने करिअरच्या सुरवातीला आपल्या संघर्षमय दिवसांबद्दल बोलताना अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान उर्फी जावेद (urfi javed) खुलासा करत म्हणाली, “मी बालपणापासूनच बाेल्ड कपडे घातले आहेत आणि तशीच राहत आहे. मला काही असे घालण्याची इच्छा असेत जे सगळ्यापेक्षा वेगळे असेल. मी बाेल्ड आहे आणि ते माझ्या कपड्यात ही दिसायला हवं. लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार कपडे घालतात. तुम्ही कार्डी बी कडून साडी नेसण्याची अपेक्षा करू शकत नाही.”

यासाेबतच उर्फीने आपल्या छोट्या पडद्यावरील सुरुवातीच्या दिवसांबद्दलही धक्कादायक खुलासे केले. उर्फी म्हणाली, “माझा मुंबईतील प्रवास खूप कठीण होता. मुंबईत मला किती त्रास सहन करावा लागला हे मला माहीत आहे. पण अडचणींशिवाय यशाचा आनंद घेण्यात मजा येत नाही. मी संघर्षमय जीवन जगले आहे. अनेक लोक तुमचा गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न करतात.” ती म्हणाली, “मी एका पौराणिक शोचा भाग होते, ज्यासाठी मी सकाळी 5.30 वाजता नायगावच्या सेटवर पोहोचले. तिथे मी 6-7 तास माझ्या खोलीत राहिले. मात्र, त्यावेळी तिथे कोणीही आले नाही तेव्हा मी काय झाले असे विचारले असता, मला सांगितले की, मला काढून टाकले आहे. मला वाटते की, कदाचित त्यांनी माझे इंस्टाग्राम पाहिले आणि विचार केला की, मी त्या शोचा भाग बनण्यास पात्र नाही.”

उर्फी जावेदने तिचा एक्स बॉयफ्रेंड पारस कालनावतबद्दलही सांगितले. उर्फी म्हणाली, ‘आम्ही शत्रू नाही. आम्ही आमचा प्रवास एकत्र सुरू केला आहे आणि साेबतच कठीण काळ पाहिला आहे. ऑटोमध्ये खजूर खायचो. त्याच वेळी उर्फीने सांगितले की, मी सध्या सिंगल आहे आणि ज्याप्रकारे मला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो त्याप्रकारे त्याने करु नये.” ती म्हणतो की, “प्रत्येकालाच ट्रोलिंग करणे सोयीचे नसते.”

प्रत्येकवेळी उर्फी जावेदच्या मालमत्तेबद्दल प्रश्न उपस्थित होतो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे आणि ती दर महिन्याला लाखोंमध्ये कमावते. माध्यमांतील वृत्तांनुसार, उर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये घेते आणि ती दरमहा 30 लाख रुपये कमवते. त्यांची एकूण संपत्ती 172 कोटी इतकी आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
झालं एकदाचं! ‘दृश्यम 2’ चित्रपटाचं शूटिंग संपलं; साळगावकर कुटुंबावर शूट केलं ‘हे’ दमदार गाणं
अर्रर्र! ब्लेड, सिमकार्ड, पॉलिथिनचे कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदची इतकी आहे मालमत्ता

हे देखील वाचा