Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हे वेड जगावेगळे! कियारला भेटण्यासाठी चाहत्यांनी केली हद्द पार

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहते काहीही करून शकतात. शाहरुख खान असो की, सलमान खान, चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सना भेटण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी मैलांचा प्रवास करून येतात. असेच काही बलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी सोबत घडले. कियाराचे फॅन फॉलोइंगही फारच जबरदस्त आहे. सोशल मीडियावर तिचे करोडो चाहते आहेत. चित्रपटात साकारलेल्या तिच्या प्रत्येक पात्राला चाहते भरभरून प्रेम देतात. अलीकडेच कियाराने तिच्या चाहत्याशी संबंधित एक अनुभव सांगितला आहे. हे ऐकून असे वाटते की, चाहते खरोखरच त्यांच्या स्टार्ससाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

कियारा अडवाणी (Kiara Advani) अलीकडेच वरुण धवनसोबत ‘जुग जुग जिओ’ आणि कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात दिसली होती. कियाराच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. यासोबतच या अभिनेत्रीने ‘कबीर सिंग’, ‘शेरशाह’, ‘गुड न्यूज’ सारख्या चित्रपटांमध्येही आपला दमदार अभिनय सादर केला आहे. कियाराच्या कामासोबतच अभिनेत्रीची फॅन फॉलोइंगही सातत्याने वाढत आहे.

चाहत्याला पाहून कियाराला बसला धक्का
माध्यमांतील वृत्तानुसार, कियाराला भेटण्यासाठी एका चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. या चाहत्यांची गोष्ट स्वतःह अभिनेत्रीने मीडियासोबत शेअर केली आहे. तिने सांगितले की, “ती मुंबईतील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहते. जिथे एके दिवशी अचानक कोणीतरी घुसले होते. तो माणूस कियाराच्या खोलीबाहेर उभा होता. कियाराला भेटण्यासाठी हा चाहता इमारतीच्या वरच्या बाजूला आला होता. कियाराने दरवाजा उघडला तेव्हा चाहता कियारा समोर उभा होता. चाहत्याला पाहून कियारा खूप घाबरली होती.” कियाराने विचारल्यावर चाहत्याने सांगितले की, तो सर्व पायऱ्या चढून तिला भेटायला आला आहे.” एकीकडे कियारा चाहत्याला पाहून खूश दिसत होती, तर दुसरीकडे तिला भीतीही वाटत होती. कियाराने चाहत्याबद्दल सांगितले की, “तो एक चांगला माणूस होता.”

कियारा आणि सिद्धार्थ अडकणार लग्नबंधनात
सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे कियारा अडवाणी सध्या खूपच चर्चेत आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार कियारा आणि सिद्धार्थ पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही. बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या सिद्धार्थ आणि कियाराने कॉफी विथ करण या टीव्ही शोमध्ये याचा खुलासा केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
करीनाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
‘धक धक गर्ल’चे आई बनल्यानंतर बदलले आयुष्य; म्हणाली, ‘घरी बसून…’

हे देखील वाचा