‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद हिच्या अतरंगी स्टाइलची सध्या भारतातच नाही ,तर परदेशातही चर्चा होत आहे. उर्फी नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. विचित्र फॅशनिस्ट असलेली उर्फी पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर कहर करताना दिसली. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. उर्फीचा हा लूक ज्याणं कोणी पाहिला तो भारावून गेला. उर्फी जावेदच्या या फोटोवर ट्रोल्स जोरदार कमेंट करत आहेत आणि तिचा क्लास घेत आहे.
लोकांनी उर्फीला म्हटले कॉपी कॅट
या व्हिडिओमध्ये उर्फी (urfi javed) हिने तपकिरी रंगाची पँट आणि चांदीच्या रंगाच्या फुफ्फुसाच्या डिझाइनचा हार घातलेला दिसत आहे. उर्फी जावेदची ही स्टाईल पाहून सगळेच थक्क झाले. पूर्णपणे बॅकलेस असलेल्या ड्रेसमध्ये उर्फीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीची ही स्टाईल हॉलिवूडची प्रसिद्ध मॉडेल बेला हदीदला मिळती जुळती आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी उर्फीला कॉपी कॅट म्हटले आहे. कान्स 2021 मध्ये बेला नेही असाच एक नेकलेस कॅरी केला हाेता. मात्र, तिचा याचा गाेल्डन रंग हाेता आणि उर्फीचा सिल्वर रंग आहे.
View this post on Instagram
उर्फीला खरी ओळख मिळाली ती रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’मुळे
उर्फी जावेदच्या टीव्ही करिअरबद्दल बोलायचे, तर ती आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’, ‘चंद्र नंदिनी’ आणि ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’ आणि ‘दायन’मध्येही काम केले आहे. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती रिऍलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आल्यानंतर. अलीकडेच, तिने तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये तिचा एक्स बाॅयफ्रेंड पारस कालनावत देखील उपस्थित होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शर्लिन चोप्राने केली साजिद खानविरोधात तक्रार, ‘बिग बॉस 16’ मधून काढण्याची विनंती
धमाका! खेसारी लाल यादवच्या ‘छठ घाटे चली’ गाण्यानं घातली धुमाकूळ, पाहा व्हिडिओ