Saturday, May 23, 2026
Home अन्य प्रसिद्ध सिंगर हरपला! दिलजानचे रस्ते अपघातात निधन; पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध सिंगर हरपला! दिलजानचे रस्ते अपघातात निधन; पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली

संगीत क्षेत्रातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात निधन झाले आहे. ही घटना मंगळवारी (३० मार्च) सकाळी अमृतसर येथे घडली. या बातमीनंतर दिलजानच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरून त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचाही समावेश आहे.

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये शोककळा
दिलजानच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार दिलजानच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना तेव्हा घडली, जेव्हा दिलजान अमृतसरवरून करतारपूरला जात होता.

चाहत्यांसोबतच कलाकारांनीही वाहिली श्रद्धांजली
दिलजानच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि कलाकार दिलजानला श्रद्धांजली वाहत आहेत. गायक सुकशिंदरने दिलजानचा फोटो शेअर करत लिहिले की, “हे दुर्दैवी वृत्त सकाळी सकाळी मिळाले. म्युझिक इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. या दुनियेतून दिलजानने निरोप घेतला आहे.”

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही वाहिली श्रद्धांजली
“सकाळी सकाळी पंजाबी गायक दिलजानच्या मृत्यूच्या धक्का बसला. रस्त्यावर असेच तरुणांचे प्राण गमावणे हे अत्यंत वाईट आहे. त्याचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांविषयी माझी सहानुभूती. आरआयपी!”

दिलजानची प्रसिद्ध गाणी
दिलजान पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. त्याचा चाहतावर्गही फार मोठा होता. दिलजानच्या हिट गाण्यांमध्ये ‘आधा पिंड’, ‘यारां दी गल’, ‘शू करके’, ‘हर पल’, ‘फर्स्ट लव्ह’, ‘मेरा दिल’, ‘धरती’, ‘तेरे शहर’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने केले ‘असे’ ट्वीट की झाला भलताच ट्रोल, नेटकरी म्हणालेे ‘ईदलाही हेच म्हणणार?’

-प्रेम हे! ‘हॅप्पी किस डे’ म्हणत प्रिन्सने केला पत्नी युविकाला किस करतानाचा फोटो शेअर; वेधले चाहत्यांचे लक्ष

-अभिनेत्री मलायकाकडून चाहत्यांना होळीच्या कलरफूल शुभेच्छा! फोटो होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा