बिग बॉसचे घर एक अशी जागा आहे, जिथे या शोनंतर स्पर्धकांचे आयुष्य बदलते असे म्हटले जाते. बहुतेक स्पर्धकांना नवीन ऑफर मिळतात, आर्थिकदृष्ट्या चांगली मदत मिळते. पण काही स्पर्धक असेही आहेत, ज्यांची परिस्थिती उलट हाेते. ‘बिग बॉस 13‘ची माजी स्पर्धक हिमांशी खुराणासोबतही असंच काहीसं घडलं. शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेल्या नकारात्मक बदलांबद्दल ती मीडियासमोर बोलली आहे.
हिमांशी खुराना (himanshi khurana) ही पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 2019 मध्ये बिग बॉस 13 (bigg boss 13 ) मध्ये भाग घेतला होता. या शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना असे वाटले की, हिमांशीचे आयुष्य व्यावसायिकदृष्ट्या बदलणार आहे. तिला अनेक चांगल्या ऑफर्स मिळतील. पण तसे झाले नाही. बिग बॉस 13 मधून बाहेर आल्यानंतर हिमांशी डिप्रेशनमध्ये गेली.
पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर हिमांशीला बिग बॉस 13 ची ऑफर मिळाली. शोमध्ये तिची असीम रियाजसोबत चांगली मैत्री झाली. मात्र, शोमधून बाहेर आल्यानंतर हिमांशीचे आयुष्य खूपच बदलले. माध्यमातील वृत्तानुसार हिमांशीने सांगितले की, “जेव्हा मी बिग बॉसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला वाटले की, आयुष्य बदलणार आहे. पण हे वास्तव नव्हते. मला तिथं इतक्या नकारात्मकतेचा सामना करावा लागला की, तिथून बाहेर यायला मला 2 वर्षे लागली.”
View this post on Instagram
हिमांशी म्हणाली, “मी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. कार्यक्रम, शूटिंगला जाण्यापूर्वी मला पॅनीक अटॅक यायचे. अफसाना खानच्या लग्नाच्या वेळीही मला डान्स करताना हृदयाचा त्रास झाला होता. यानंतर मला रुग्णालयात नेण्यात आले. रिऍलिटी शोमध्ये काम करणे हा माझ्या जीवनाचा वाईट अनुभव हाेता. मी डिप्रेशन मध्ये गेली. मला बरे व्हायला आणि लाइफ टाइमवर यायला खूप वेळ लागला.”
हिमांशी खुराना ही पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने ‘लेदर लाइफ’, ‘दो बोल’, ‘अफसर’ ‘सद्दा हक’,आणि ‘शवा नी गिरधारी लाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (tv big boss show ex contestant himanshi khurana reveal she went into depression post bigg boss 13 show)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीनं व्यक्त केलं एकमेकांवरचं प्रेम; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या प्रकाशाचा किरण…’
बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा प्रेमात! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट










