भोजपुरी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी रवी किशन हे सतत आपल्या चित्रपाटमुळे आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखले जातात. त्यांनी चित्रपाटमध्ये कॉमेडी आणि खलनायकाच्या भूमिका निभावल्या असून आजही त्यांचे कौतुक केले जाते.मात्र. यावेळेस अभिनेताने कॉंग्रेस पक्षावर टीका करत असे काही विधान केले आहे, ज्यामुळे अभिनेत्याने प्रेत्येकाचेच लक्ष वेधले आहे.
नुकतंच भारतीय जनता पक्षाचे विधायक आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी कॉंग्रेस पक्षावर एक घनाघाती आरोप करत निशाना साधला आहे, ज्यामुळे अभिनेता खूपच चर्चेत आले आहेत. त्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याची तरतूद असलेले खासगी सदस्य विधेयक शुक्रवार (दि, 9 डिसेंबर) रोजी लोकसभेत मांडण्यात आले. तेव्हा त्यांनी त्याला चार मुले झाली आहेत याचा दोष कॉंग्रेस सरकरावर लावला आहे. खरे तर लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणल्यामुळे चर्चेत आलेले रवी किशन यांनी हे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते.
भाजप संसद रवी किशन यांनी सांगितल होते की, “अरे भाऊ, हे बील कॉंग्रेसने आधी आणले असते तर आम्ही थांबलो असतो. यांच्या अशा वक्तव्यावर प्रतिउत्तर देत सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मुलं जन्म घेत गेली आणि तुम्हाला समजलेच नाही का? चला कॉंग्रेसच्या कृपेमुळे तुम्ही 3 मुली आणि एका मुलाचे बाप तरी बनलात. लोकरांना जन्म देऊन पत्नीचे शरीर बिघडे- हे तुमचे पत्नी प्रती प्रेम नाहीतर बॉडी शेमिंग आहे.” मात्र, अभिनेत्याने त्यांच्या इंग्रजीवर टोला मारत सुप्रियाजींना थेट भोजपुरीमध्ये लिहित सांगितले की, और हां अंग्रेजी बड़े ऐक्सेंटवा से बोलत हवा, कहां सिखला?’
—“बच्चे पैदा होते गए” और आपको पता ही नहीं चला? चलो कांग्रेस की कृपा से आप 3 बेटियों और 1 बेटे के पिता तो बन गए ????
—“शरीर बिगड़ गया पत्नी का बच्चे पैदा करने से” – यह पत्नी के लिए प्यार नहीं body shaming है
—और हाँ अंग्रेजी बड़े ऐक्सेंटवा से बोलत हवा, कहाँ सिखला? https://t.co/2EyCLlRChl
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 9, 2022
झाले असे की, भाजप संसद रवी किशन यांनी शुक्रवारी विधान सभेत त्यांना चार मुलं असल्याचं कॉंग्रेस पक्षाला दोषी मानलं आहे. त्यांच्या मते, जर कॉंग्रेसने त्या वेळी लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवला असता तर ते थांबले असते. त्यांनी सांगितले की, जर कॉग्रेस सरकारने त्यावेळी हे बिल आणले असते आणि काही कायदा केला असता तर आज माझे चार मुलं नसती. काँग्रेस सरकारमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नव्हती, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रणाची बिलं आणावे लागले आहेत.
त्यावेळी रवी किशनने अभिनय क्षेत्रामधील त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले की, “पूर्वी मी फक्त कामावरच लक्ष देत होतो. त्यांनी एकानंतर एक करत चार मुलं झाली आणि त्याच्यामुळे माझ्या बायकोला त्रासही झाला. पहिल्या आणि दुसऱ्या डिलेवरी नंतर तिची तब्येत बिघडताना दिसली, त्यावेळी मी संघर्ष करत होतोआणि कामामध्ये खूप व्यस्त होतो. लेकरं जन्म घेत गेली, त्यावेळी आम्हाला फार काही माहीत नव्हती. आता मात्र, मी माझ्या बायकोकडे बघतो तेव्हा मला फार वाइट वाटते.”
कॉंग्रेसवर आरोप करणेयाशिवय अभिनेताने आपल्या पत्नीविषयी काळजी देखिल व्यक्त केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! दिग्गज अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या, आरोपीच्या पिंजऱ्यात पोटचा मुलगा
‘इंडियन आयडल’च्या मंचावर हेमा मालिनी यांनी बोलता बोलता सांगितला ‘हा’ गुपित किस्सा










