Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘सर तुमचे जॅकेट खूप छान आहे’, चाहत्याने असं म्हणताच विद्युत जामवालने जॅकेट केले गिफ्ट, व्हिडिओ जोरदार व्हायरल

‘सर तुमचे जॅकेट खूप छान आहे’, चाहत्याने असं म्हणताच विद्युत जामवालने जॅकेट केले गिफ्ट, व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल याने आपल्या अभिनयाने आणि ऍक्शन सीनने सगळ्यांच्या मनात जागा बनवण्यात कोणतीही कसर नाही सोडली. तो आपल्या चित्रपटासोबतच त्याच्या स्टाईलने खूप चर्चित आहे. विद्युत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो फोटोग्राफरला त्याचे जॅकेट देताना दिसत आहे.

विद्युत जामवाल याचा हा व्हिडfओ त्याच्या फॅनपेजने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचे सगळे चाहते देखील त्याचे खूपच कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विद्युतचे जॅकेट घेतल्याने फोटोग्राफरला खूपच आनंद झाला आहे.

विद्युत जामवालला बघून फोटोग्राफर तिथे येतो आणि त्याला विचारतो की, सर तुम्ही कसे आहात? यावर विद्युत उत्तर देतो की, हो मी एकदम ठीक आहे. त्यावेळी तो फोटोग्राफर म्हणतो की, ‘सर तुमचे जॅकेट खूप छान आहे.’ फोटोग्राफरची ही गोष्ट ऐकून तो लगेच त्याचे जॅकेट काढून फोटोग्राफरला गिफ्ट देतो. यावर फोटोग्राफर म्हणतो की, ‘सर तुमचा टी शर्ट पण छान आहे.’ यावर विद्युत हसून म्हणतो ‘अच्छा!! टी शर्ट पण छान आहे का?’ त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. जाता जाता तो फोटोग्राफर म्हणतो की, ‘सर तुम्ही तुमचे काम असेच चालू ठेवा.’

विद्युत जामवालने ‘फोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने खलनायकाचे पात्र निभावले होते. यासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम पदार्पणचा पुरस्कार देण्यात आला होता. यासोबतच त्याने दाक्षिणात्य चित्रपटातपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट केले आहे. पण त्याला खरी लोकप्रियता त्याच्या ‘कमांडो’ या चित्रपटातून मिळाली. आंतरराष्ट्रीय स्थरातील मीडियाने त्याला भारताचा ब्रुसली म्हणण्यास सुरुवात केली आहे. तो लवकरच ‘द पॉवर’ आणि ‘सनक’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा