Saturday, April 4, 2026
Home टेलिव्हिजन ब्रेंकिग! किडनी फेल झाल्यानं प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, कलाविश्वावर शाेककळा

ब्रेंकिग! किडनी फेल झाल्यानं प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, कलाविश्वावर शाेककळा

ज्येष्ठ अभिनेत्री रजिता कोचर यांनी वयाच्या अवघ्या 70 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. रजिता कोचरने त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये शानदार भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ‘तंत्र’, ‘कवच- काली शक्ती से’, ‘कहानी घर घर की’ यांचा समावेश आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्रीचे किडनी फेल झाल्याने त्यांचे निधन झाले.

अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती त्यांची भाची नुपूर कंपानी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “अभिनेत्रीला श्वास घेण्यात अडचण आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, उलट त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. यानंतर त्यांचे निधन झाले.

नुपूर कंपानी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “रजिता कोचर यांना सप्टेंबर 2021 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे त्या पॅरलिसिसशी झुंज देत हाेत्या.” नुपूर पुढे म्हणाल्या की, “त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती, पण 20 डिसेंबरला त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची आणि पोटदुखीची तक्रार केली. आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. 23 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, रात्री 10.15 वाजता त्यांचे निधन झाले.

अभिनेत्रीसोबतच्या संभाषणाची आठवण करून देताना नुपूर म्हणाली, “जेव्हा मी 23 डिसेंबरच्या संध्याकाळी त्यांना भेटले तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि प्रत्येक गोष्टीसाठी माझे आभार मानले. मी त्याला सांगितले की, त्यांना माझ्यासाठी जगावे लागेल, म्हणून त्याने होकार दिला. हे माझे त्यांच्यासाेबतचे शेवटचे बोलणे होते. आता ती निघून जाणार आहे हे तिला कळून चुकल्यासारखे वाटते. नुपूर म्हणाली की, अभिनेत्री तिच्यासाठी आईसारखी होती. तिचे सहकलाकारही तिला आई म्हणत असत.”

अभिनेत्रीच्या जाण्याने कलाविश्वावर शाेककळा पसरली आहे. (kahaani ghar ghar kii fame actress rajeeta kochhar passed away)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आपल्या लावणीने आख्खा महाराष्ट्र गाजवणारी गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर, सिनेमाचं नाव पण ठरलं

अंगावर काटा आणणारी बातमी! 20 वर्षीय अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर फाशी घेत संपवलं आयुष्य

हे देखील वाचा