Saturday, February 22, 2025
Home वेबसिरीज बाबो! चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका ‘या’ वेब सीरिज

बाबो! चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका ‘या’ वेब सीरिज

पूर्वी एखाद्या सिनेमात अगदी काही सेकंदांचा बोल्ड सीन असेल तरीही मोठे वाद व्हायचे. अनेक वेळा सेन्सॉर बोर्डच त्याला कात्री लावायचं. परंतू आता सिनेमे आणि वेबसिरीजमध्ये आपण अनेक बोल्ड सीन्स पाहातो. त्यातही ओटीटी प्लॅटफऑर्मवर कोणतीही सेन्सॉरशीप नसल्यामुळे येथे अनेक सिरीजमध्ये बोल्ड सीन सर्सास दिसतात. आपण अशाच ५ वेबसिरीजबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांमध्ये प्रचंड बोल्ड सीन आहेत.

फोर मोर शॉट्स प्लीज

फोर मोर शॉट्स प्लीज (Four More Shots Please!) ही वेबसिरीज २०१९मध्ये ॲमेझॉन प्राईजवर रिलीज झाली. त्यानंतर २०२२मध्ये या सिरीजचा दुसरा सिझन आला तर नुकताच तीचा तिसरा सिझन रिलीज झाला. या सिरीजमध्ये चार मुलींची स्टोरी दाखविण्यात आली आहे. या सिरीजमध्ये चारही कॅरॅक्टर वेगवेगळ्या सुखाच्या शोधात दाखवली आहेत. मुंबईमध्ये घडणाऱ्या या स्टोरीमध्ये अनेक बोल्ड सीन्स दाखविण्यात आले आहेत.

ॲनिवर्सरी सरप्राईज

ॲनिवर्सरी सरप्राईज (Anniversary Surprise) ही वेबसिरीजही प्रचंड बोल्ड शॉट्ससाठी ओळखली जाते. ULLU ॲपवर ही वेबसिरीज रीलीज झाली. शिखा छाबरा आणि यश पंडित यांनी या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ही वेब सिरीज एका हत्येच्या रहस्यावर आधारित आहे.

पांचाली
पांचाली (Panchali) वेबसिरीजही ॲनिवर्सरी सरप्राईज प्रमाणेच ULLU ॲपवर रिलीज झालेली आणखी एक बोल्ड सिरीज. या वेब सिरीजमध्ये एका महिलेला चार पती आहेत. या वेब सिरीजमध्ये खूप जास्त बोल्ड सीन्सचा वापर करण्यात आला आहे. ११हून अधिक वेबसिरीजमध्ये जबरदस्त भूमिका साकारलेली अनुप्रिया गोयंका या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे.

लस्ट स्टोरीज
सन २०१८ साली रिलीज झालेल्या कियारा (Kiara advani) अडवाणीच्या लस्ट स्टोरीज (Lust Stories) या वेबसिरीजने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. या वेबसिरीजमध्येही जबरदस्त बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. ‘कबीर सिंह’ चित्रपटात निरागस दिसणारी कियारा अडवाणी ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये तितकीच बोल्ड दिसली. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सलवर पाहता येईल.

मस्तराम
एम एक्स प्लेयरवरील मस्तराम (Mastram) वेबसिरीजनेही धाडसाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या वेबसिरीजची कथा एका लेखकाच्या आयुष्याभोवती फिरते. लेखक म्हणून काही तरी वेगळं करण्याच्या नादात तो बोल्ड मासिकासाठी लिहू लागतो. त्याचा प्रवास या सीरिजमध्ये पाहायला मिळेल.

व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ
‘मुलगी तर मुलगी आता आई पण!’ रिषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीच्या आईने शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा