‘या’ वेबसिरीजने ओलांडल्यात बोल्डनेसच्या सर्व सीमा; जाणुन घ्या कोणत्या ओटीटीवर झाल्या आहेत रिलीझ


मागील काही महिन्यांपासून वेबसिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला सोनेरी दिवस आले आहेत. प्रेक्षकांची या नवीन प्लॅटफॉर्मला मिळणारी पसंती विलक्षण आहे. वेबसिरीजला अजूनतरी कोणती जास्त बंधन नसल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर बोल्ड, ऍक्शन, ड्रामा, रोमँटिक आदी अनेक प्रकारचे विविध प्रकारचे सर्वच कंटेन्ट दाखवता येतात. या प्लँटफॉर्मकडे पाहिले, तर अनेक वेगवेगळ्या आशयाच्या उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळतात. सोबतच अनेक बोल्ड वेबसिरीजदेखील भरपूर प्रमाणात पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला या प्लॅटफॉर्मवरील सर्वात बोल्ड वेबसिरीजबद्दल जाणून घेणार आहोत.

वर्जिन भास्कर- जी५
या सिरीजचा विषयच कामुक असून, यात एक अविवाहित असलेल्या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा मुलगा कामुक लेख लिहितो. सोबतच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असलेली त्याची केमिस्ट्री पाहणाऱ्याला नक्कीच रोमांचित करणारी आहे. ही सिरीज तुम्ही जी५ आणि अल्ट बालाजीवर तुम्ही पाहू शकतात.

फोर मोर शॉट्स प्लीज- अमेझॉन प्राइम
ही सिरीज चार भारतीय मुलींवर आधारित आहे. चार वेगवेगळ्या वातावरणातून येणाऱ्या या मैत्रिणींना अतिशय वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आले आहे. या चार मुली त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड देत असतात. मात्र असे असूनही एकमेकींना भेटल्यानंतर त्या त्यांचे सर्व प्रॉब्लेम सांगतात त्यावर चर्चा करतात. या सिरीजमध्ये प्रत्येक विषयावर मोकळेपणाने भाष्य करण्यात आले आहे. ही सिरीज तुम्ही अमेझॉन प्राइमवर पाहू शकतात.

 

हॅलो मिनी- एमएक्स प्लेयर
ही सिरीज अतिशय बोल्ड असून, यात भरपूर बोल्ड सीन्सचा भरणा करण्यात आलं आहे. सस्पेन्सयुक्त या सिरीजमध्ये शेवटी दाखवला गेलेला सस्पेन्स देखील लोकांना आवडत आहे. याचे दोन सीझन आले आहेत. यात प्रिया बॅनर्जी, अर्जुन अनेजा, गौरव चोप्रा, मृणाल दत्त, अनुजा जोशी, अंकुर राठी आदी कलाकार आहे. ही सिरीज एमएक्स प्लेयरची आहे.

फु से फँटसी- वूट
१० भागांची असलेली ही सिरीज देखील बोल्ड कंटेन्टसाठीच प्रसिद्ध झाली आहे. या सिरीजमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. जसे करण वाही, प्लाबिता बोरठाकुर, नवीन कस्तुरिया, अंशुमन मल्होत्रा, गौरव पांडे, अनुप्रिया गोयंका आहेत.

गंदी बात- अल्ट बालाजी

अल्ट बालाजी म्हणजेच एकता कपूरची ही सिरीज अतिशय बोल्ड आहे, हे त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल. यात समाजतील त्या काही गोष्टींना दाखवण्यात आले आहे, ज्यावर कोणी बोलत नाही. ही सिरीज तुम्हाला एकट्यात पाहावी लागेल एवढे यात बोल्ड सीन्स आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.