Sunday, May 3, 2026
Home बॉलीवूड बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन, सत्तरच्या दशकात साकारली होती खलनायिकेची भूमिका

बॉलिवूडला मोठा धक्का! प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन, सत्तरच्या दशकात साकारली होती खलनायिकेची भूमिका

चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे निधन झाले आहे. त्या ८८ वर्षांच्या होत्या. रविवारी (४ एप्रिल) मुंबईच्या कोलाबा येथे दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी सत्तरच्या दशकात अभिनेत्री आणि खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चाहते तसेच सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

बॉलिवूडमध्ये १०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जवळकर असे होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट, १९३२ रोजी सोलापूर येथे झाला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढ- उतार पाहिले होते. तरीही, त्यांचे बालपण हे ऐशआरामात गेले होते. ते ६ भावंडे होते. शशिकला यांचे वडील फार मोठे व्यावसायिक होते.

‘या’ चित्रपटांमध्ये केले काम
शशिकला या लहानपणापासूनच डान्स आणि गायनाची आवड होती. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय ठप्प पडल्यानंतर त्या कामाच्या शोधात मुंबईला आल्या होत्या. इथे त्यांची भेट नूर जहां यांच्याशी झाली होती. त्यांच्यामुळेच शशिकला यांना चित्रपटात काम मिळण्यास मदत झाली होती. शशिकला यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले होते. त्यात धर्मेंद्र, शम्मी कपूर, संजय दत्त यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

शशिकला यांनी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  त्यामध्ये ‘जंगली’, ‘लेक चालली सासरला’, ‘घर घर की कहानी’ ‘तीन बत्ती चार रास्ता’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘चोरी चोरी’, ‘नीलकमल’, ‘अनुपमा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता.

चित्रपटासोबतच त्यांनी टीव्ही मालिकेतही काम केले होते. त्यांनी प्रसिद्ध ‘सोन परी’ मालिकेत आजीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे सन २००७ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा