‘गुंडे‘ चित्रपाटातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता अर्जुन कपूर हा आपल्या अभिनयापेक्षा जास्त वैायक्तीक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. नुकतंच अभिनेता ‘कुत्ते’ हा आगामी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुनला त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा हिच्या नावाने चिडवू लागले ज्यावेळी अभिनेता काहीतरी वेगळंच बोलून गेला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malayka Arora) सतत आपल्या नत्यामुळे ट्रोल होत असतात. मात्र, यावेळी अर्जुन त्याच्या आगामी येणारा चित्रपट कुत्ते (Kuttey)च्या प्रमोशनला आला तेव्हा तिथे देखिल चाहते त्याला मलायकाच्या नावाने चिडवू लागले ज्यानंतर अर्जून लाजून लाला झाला की, चाहते त्याची स्तुती करण्यापासून रोखू शकले नाही. त्याशिवाय या प्रमोशनचा व्हिडिओदेखिल सोशल मीडियावर क्रेज करत आहे
मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत असून बिंदास्तपणे त्यांच प्रेम व्यक्त करत असतात. दोघेही एकमेकांबद्दल खूप काही गोष्टी शेअर करत असातात. अर्जून त्याच्या कुत्ते चित्रपटाच्या प्रमोशनासाठी एका कार्यक्रमामध्ये पोहोचला होता तेव्हा, अर्जुन एक पत्रकाराला म्हणतो की, ‘तू आधी चॅटिंग संपव आणि मग बोलू’, अभिनेत्याच्या अशा वक्तव्यानंतर चाहते त्याला मलायकाच्या नावाने चिडवू लागतात. यावर अर्जून लाजतो आणि म्हणतो की, “मलायका सध्या इथं नाही, त्यामुळे आता राधिकासोबतच काम चालवावं लागेल. माझी सहकलाकार राधिका सोबत काम करतो. मला खात्री आहे की, मलायकाने राधिका बरोबर धन टे नानच्या डान्स स्टेपला परवानगी दिली असती.”
View this post on Instagram
अर्जुन कपूर आणि राधिका मदन (Radhika Madan) यांचा आगामी येणारा चित्रपट कुत्ते (दि, 13 जानेवारी 2023) रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे तर दुसरीकडे मलायका तिचा नवीन शो ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ साठी चांगलीच चर्चेत असते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कमाईत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या ‘युट्यूबचा बादशाह’ भुवन बामची नेट वर्थ आहे तरी किती? जाणून घ्याच
प्रसिद्ध अभिनेत्याने नवीन वर्षात केला चांगला संकल्प; मुलासाठी सोडली ‘ही’ वाईट सवय