मराठी चित्रपटांसाठी २०२३ या नवीन वर्षाची सुरुवात एकदम दणक्यात झाली. ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित ‘वेड’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला असला तरी अजूनही सिनेमा प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे, आणि कोटींमध्ये कमाई करत आहे. या सिनेमामुळे मराठी सिनेमाला उत्तम सुरुवात तर मिळाली शिवाय शांत असलेल्या मराठी बॉक्स ऑफिसला नवीन उभारी मिळाली आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलिया देशमुख अभिनित या सिनेमाची आणि सिनेमातील गाण्यांची भुरळ बॉलीवूडला देखील पडल्यावाचून राहिली नाही. अनेक बॉलिवूड स्टार्स या सिनेमातील गाण्यांवर, संवादांवर त्यांचे रील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. याशिवाय या सिनेमामुळे अनेक कलाकार मराठीमध्ये बोलताना देखील दिसत आहे. या सिनेमाबद्दल हे कलाकार देखील त्यांच्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत आहे.
अशीच एक पोस्ट बॉलिवूडचा जुनियर बच्चन अर्थात अभिषेक बच्चनने केली आहे. अभिषेकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “हे खूप अद्भूत आहे. रितेश आणि जिनिलिया मस्त! खूप आनंद झाला. #Vedhit.” अभिषेकच्या या पोस्टवर उत्तर देताना जिनिलिया देशमुखने “धन्यवाद अभिषेक बच्चन. तू माझ्या आणि रितेशच्या सोबत कायमच होतास. मी खरंच हे नुसते बोलायचे म्हणून बोलत नाही, आपण रोजच यावर भरपूर चर्चा केली आहे.” असे म्हटले आहे.
View this post on Instagram
याशिवाय काही दिवसांपूर्वी रितेशने अभिषेक बच्चनसोबत वेड या सिनेमातील ‘मला वेड लावले’ या गाण्यावरील त्यांचा डान्स व्हिडिओ शेअर केला होता. यात हे गाण्याची हुक स्टेप करत नंतर नागीण स्टेप करताना दिसले. तत्पूर्वी वेड सिनेमाने आतापर्यंत २७.७२ कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर पहिल्याच आठवड्यात वेडने २०.६७ कोटींचा गल्ला जमवला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न
‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल