बॉलिवूड अभिनेत्री महक चहलला गंभीर स्वरूपात रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून महक मुंबईच्या एका रुग्णालयात भरती असून, तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र आता महकच्या तब्येतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा असल्याचे समजत आहे. मात्र अजूनही ती आयसीयूमध्येच असून तिच्या तब्येतीबद्दल तिने स्वतः अपडेट दिले आहे.
महक चहलने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले की, “मला निमोनिया झाला होता, त्यामुळे मी मागील ३/४ दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. मला ऑक्सिजन व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. मी २ जानेवारीला अचानक खाली पडली आणि तेव्हा मला श्वास घ्यायला त्रास होत होता. तेव्हा मला रुग्णालयात नेले गेले आणि मला पाहून डॉक्टरांनी लगेच उपचार चालू केले. माझा सिटी स्कॅन केला गेला. मागील ८ दिवसांपासून माझ्यावर उपचार चालू आहे. आता मी जनरल वॉर्डमध्ये असून माझ्या तब्येतीमध्ये खूपच सुधार आहे. मात्र अजूनही मला श्वास घ्यायला त्रास होत आहे.”
View this post on Instagram
पुढे महक म्हणाली, “मी खूपच घाबरली होती. मी माझ्या आयुष्यात कधीच त्या पॉइंटवर पोहचली नाही, जिथे मी श्वास घेऊ शकत नाही. मला नेहमीच खोकलताना त्रास होत होता. मात्र मला वाटले सर्व काही ठीक होईल. मी अराम करू इच्छित होती म्हणून कोणाला संपर्क केला नाही. सुरुवातीला मला वाटले मला नॉर्मल सर्दी झाली. तेव्हा मला वाटले नाही माझी सर्दी, खोकला एवढा गंभीर होईल.” तत्पूर्वी महक सलमान खानच्या रियालिटी शो बिग बॉसमध्ये झळकली आहे. ती बिग बॉसच्या पाचव्या पर्वात दिसली होती. यासोबतच ती अनेक बॉलिवूड आणि मालिकांमध्ये झळकली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल