Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

थलापतीच्या ‘वरिसु’ चित्रपटाचा परदेशातही वाजतोय डंका, तीन दिवसातच पार केला 100 कोटींचा गल्ला

दाक्षिणात्य सुपरस्टारर थलापती याने आपल्या दमदार अभिनयने आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. दक्षिणच नाही तर थलापतीचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. सध्या थलापतीचा नुकतांच प्रदर्शित झालेल्या वरिसु चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला आहे. वरिसु चित्रपटासोबतच वेड आणि कुत्ते हे तीन चित्रपटामध्ये चांगलीच स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, बॉक्सऑफिसवर वरिसु चित्रपटाने मागे सोडले आहे.

सध्या बॉक्सऑफिसवर  तीन चित्रपट एकाच वेळी सिनेमा गृहामध्ये प्रदर्शित झाले असून वरिसु चित्रपटाने बाजी मारली आहे. थलापती विजय (Vijay Thalapathy) याच्या वरिसु (Varisu) चित्रपटाने बक्सऑफिवसर जबरदस्त कामगिरी केली आहे. वरिसु हा चित्रपट (दि, 11 जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात उतरला आहे. फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन थ्रिलर याचे मिश्रण असेलेल्या चित्रपटामध्ये सगळ्यांना पूर्वीचा थलापती पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाने जगभरात चागंलाच गल्ला जमवला आहे.

सोशल मीडियावरही वरिसु चित्रपट ट्रेंड करत असून अनेक चाहते  कौतुकाचा वर्षावर करत आहेत. वरिसु चित्रपटाने भारतातच नाही तर विदेशातही प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. प्रदर्शानच्या तीन दिवसातच चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. जगभरात चित्रपटाने 103 कोटींचा टप्पा पार केला आहे. 100 कोटींचा आकडा पार करणारा थलापतीचा हा 10 वा चित्रपट ठरला आहे. वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित या चित्रपटात थलपथी विजय एका व्यावसायिकाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिवर बाकी चित्रपटांना चांगलीच टक्कर देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
महेशच्या लेकीनं मराठीतून दिल्या शुभेच्छा, आई नम्रताने शेअर केला खास व्हिडिओ
नादचखुळा! कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला ‘वेड’

हे देखील वाचा