अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी लावणी कलाकार गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत्याने चर्चेत आहे. सोशल मीडिया तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. एका सांस्कृतिक कार्यक्रमात तिने चक्क अंगावर पाणीओतून विभत्स पद्धतीने हावभाव करुन डान्स केला होता. लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्ययावरुन तिला जाम ट्रोल केलं होतं. यावरुन अनेक लावणी कलाकारांनी तिच्याविरोधात आक्रम भूमिका घेतली होती. आता बिग बॉस फेम मेघा घाडगे यांनी देखिल आपल्या फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत गौतमीची शाळा घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा गौतमी विरोधात संताप वक्त केला आहे.
बिग बॉस फेम मेघा घाडगे (Megha ghadge) यांच “आहो पाव्हनं…” या नव्या लावणीचे व्हिडिओ प्रदर्शन झाले आहे. मेघा घाडगे आणि त्यांच्या सोबत संजय खापरे (Sanjay Khapre) हे मुख्य भूमिकेत आहेत. या नव्या लावणीच्या व्हिडीओची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे. प्रदर्शादरम्यान मेघाजींनी अनेक प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी गौतमी पाटीलवर टीका केली आहे.
गौतमी पाटील म्हणाल्या की, “सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. शासनाने लावणीचे सेन्सॉर बंद केल्याने हा सर्व प्रकार घडत आहे. जर लावणीचं सेन्सॉर दिलं तर या प्रकाराला आळा बसेल. पण ते होत नाही. लावणीसाठीचं सेन्सॉर गेली पाच ते सहा वर्षांपासून बंद आहे. ते पुन्हा सुरु करावं यासाठी आम्ही मागे लागलो आहे. सेन्सॉर नसल्याने खुलेआम आयटम साँग सुरु झाले आहेत. ते का सुरु होत याबद्दल काहीही माहिती नाही. आयटम साँग, घागरा चोलीवर नाचणं यांसारखे अनेक प्रकार मुंबईत सुरु झाले होते. पुण्याकडच्या त्या भागात तर हे प्रकार खुलेआम आणि सर्रास घडताना दिसतात. त्याठिकाणी आळा घालणचं कठीण आहे. लोकांना चित्रपटात जे दिसतंय ते प्रत्यक्ष समोर दिसत होतं. एका तिकिटावर तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. त्यात बार बंद झालेत, डान्सबार बंद झालेत त्यामुळे खुलेआम या गोष्टी सुरु झाल्या आहेत. बालगंधर्व म्हणजे बोलण्याची स्थितीच नाही.
View this post on Instagram
मेघाजी पुढे म्हाणाल्या, लोककलावंतांची एकी नाही. त्यामुळे ही समस्या आहे. एका ग्रुपने काही केलं तर त्यांना पाठिंबा कोणी देत नाही, त्याउलट त्यांना नाव ठेवली जातात. मी जेव्हा बोलायला लागले तेव्हा लोकांना हे इतकं घाण आहे हे समजलं. त्यानंतर मात्र लोक मलाच नाव ठेवायला लागली. अनेक मुली माझ्यासमोर घळाघळा रडल्या की आम्ही उपाशी मरु, पण घागरा चोली घालून नाचणार नाही. शेवटी तो वारसा आहे त्यामुळे त्याला गालबोट लागू देणार नाही. कारण ते करत असताना खंत जाणवत असते.
त्या बोलत होत्या की, सध्या चार दिन की चांदनी आहे. लोकांना डिजे डान्स, दारु पिऊन धिंगाणा घालतात. लहान लहान मुलं-मुली समोर असतात, त्यांच्यासमोर अश्लील डान्स केला जातो. त्यांना त्यांच्या पिढीचंही पडलेलं नाही. त्यांना त्यांच्या मुला-बाळाचंही पडलेलं नाही. या गोष्टींचा परिणाम पुढच्या पिढीवर होतोय. या गोष्टीचा त्यांना पुढे पश्चात्ताप होणार आहे की यावर वेळीच आळा घालायला हवा होता. मुलींना डायरेक्ट येतेस का असं विचारला जातं. तोंडातून मुली पैसे घेतात, असे अनेक प्रकार घडतात. जे सरकार चालवतात किंवा जे कोणते गट आहेत ते याबद्दल बरचं काही बोलतात. यावर बंदी घालणार, असंही सुरु होतं. याबद्दल घडतं काहीच नाही, पण पुढे काहीही घडत नाही”,
मराठी चित्रपटामधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी कलाकार म्हणून मेघा घाडगे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्या बीग बॉस मराठी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यामधील चढउताराबद्दल सांगितले होते, तेव्हा त्या खूप भावूक झाल्या होत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट
सुहाना खानच्या ‘नो मेकअप लूक’ व्हायरल, काजोलची मुगली न्यासा झाली ट्रोल युजर्स म्हणाले…