युरोपियन चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले आहे. जगातील सर्वात सुंदर महिला असण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. जीना यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या मॅनेजरने दिले असून त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही. सोशल मीडियावर आता अनेक कलाकार, नेते इतर विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
Remembering Gina Lollobrigida – rest in peace: https://t.co/mZrZlwzY6F pic.twitter.com/tTGViSETks
— Golden Globe Awards (@goldenglobes) January 17, 2023
जीना लोलोब्रिगिडा या त्या काळातील आहे, जो काळ चित्रपटांसाठी अतिशय सोनेरी काळ समजला जातो. ४ जुलै १९२७ रोजी एका सुतार व्यावसायिक असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे तरुणपण बहुतकरून दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच व्यतीत झाले. जीना आणि त्यांच्या परिवाराचे दुरदुर पर्यंत चित्रपट आणि या क्षेत्राशी संबंध नव्हते. मात्र जीना यांचे नशीब त्यांना या क्षेत्राकडे घेऊन गेले. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मॉडलिंगने केली. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा त्यांनी इटलीमध्ये चित्रपटांची निर्मिती करायला सुरुवात केली तेव्हा त्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आल्या.
#RIP #GinaLollobrigida (4 July 1927 – 16 January 2023) ???? ????????
????#FilmTwitter pic.twitter.com/nQVKge9rdU
— Neville F Chamberlain (@NevilleFChambe1) January 16, 2023
आभाळाएवढे अवलौकिक कमावल्यानंतर जेव्हा त्यांचे सिनेकरियर डबघाईला आले तेव्हा त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर त्यांनी फोटो पत्रकारिता सुरु केली. या क्षेत्रात देखील त्यांनी मोठे नाव कमावले. त्यांच्या चित्रपटांएवढेच त्यांच्या फोटोंवर लोकांनी प्रेम केले. त्यांचे टोपणनाव लोलो होते. जीना लोलोब्रिगिडा यांनी त्यांच्या करियरमध्ये ‘ब्लॅक ईगल’, ‘कम सप्टेंबर’, ‘ट्रेपीज’, ‘अलार्म बेल्स’, ‘बीट द डेविल’, ‘बुओना सेरा’ ‘मॅड अबाउट ओपेरा’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना ‘कम सप्टेंबर’ सिनेमासाठी ग्लोब पुरस्कार देखील मिळाला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट
चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’










