Monday, June 23, 2025
Home नक्की वाचा चित्रपट प्रेमिंसाठी खुशबर! ‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त खास ऑफर, चित्रपट पहा फक्त 99 रुपयात

चित्रपट प्रेमिंसाठी खुशबर! ‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त खास ऑफर, चित्रपट पहा फक्त 99 रुपयात

मनोरंजन क्षेत्र हे वृद्धांपासून ते लहान वयोगटातील प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. कामामधून थोडा विरंगुळा म्हणून प्रत्येकच व्यक्ती चित्रपट किंवा आवडते कार्यक्रम पाहात असतता. (दि, 20 जानेवारी) रोजी हा दिवस ‘सिनेमा लव्हर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. अनेक असे व्यक्ती आहेत जे चित्रपांसाठी फारच वेडे असतात. कोणताही चित्रपट त्यांना तो पाहिल्याशिवाय मनच भरत नसते. अशाच चित्रपट प्रेमींसाठी आजचा दिवस खूपच खास ठरणार आहे, म्हणजेच आजच्या दिवशी कोणत्याही चित्रपटाची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे.

20 जानेवारी हा दिवस ‘सिनेमा लव्हर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे वळवण्यासाठी निर्माते आणि थेटर मालक विविध प्रयोग राबवत असतात. आज ‘सिनेमा लव्हर्स डे’निमित्त ‘पीव्हीआर’कडून प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर म्हणजे प्रेक्षकांना चित्रपट फक्त 99 रुपयात पाहायला मिळणार आहे

अनेक महिने चाहत्यांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली होती. अनेक मोठ मोठ्या कलाकारांचे चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर अयशस्वी ठरले. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट आज ‘पीव्हीआर’मध्ये आपल्या बजेटनुसार पाहाता येणार आहेत. पीव्हीआरच्या तिकिटांची किंमत 200 ते 1000 च्यामध्ये असते. मात्र, आज याच तिकिटांची किंमत फक्त 99 रुपये मिळणार आहेत.

या यादीमध्ये ‘द काश्मीर फाईल्स‘, ‘अवतार 2‘, ‘दृश्यम 2‘ ‘कुत्ते‘, सारखे सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना फक्त 99 रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहेत. ही संधी फक्त मर्यादित चित्रपटांसाठीच आणि मर्यादित शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लहान असताना शिल्पा शेट्टीला ‘या’ कारणामुळे वाटायचा बहीण शमिता शेट्टीचा मत्सर
सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’3 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा