Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अमिताभ बच्चन यांनी घेतली ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेस्सीची भेट, पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

काही दिवसांपूर्वीच फिफा विश्वचषक 2022 हा चुर्शीचा सामना असून मेस्सी याने हे  नामांकण आपल्या नावार केलं. जरी हा खेळ भारतातला नसला तरी भारतातील अनेक फुलबॉल लव्हर हा सामना उत्साहाने पाहात असून याचा जोदरदार जल्लोषही करण्यात आला होता, त्यावेळी अनेक कलाकारांनी कतारला धाव घेतली होती. यानंतर नुकंताच एक फुटबॉल सामना झाला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.

पेरिस सेंट जर्मेन (पीएसजी) आणि रियाद इलवेन यांच्यात नुकतांच एक फुटबॉल सामना झाला आहे, ज्यामध्ये फुटबॉल महारथी मेस्सी (Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांनी देखिल सहभाग घेतला होता. हा सामना सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये  कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मेस्सीने पीएसजी कडून तर रोनाल्डोने रियाद सीझन एलेवनकडून नेतृत्त्व करत दमदार खेळी खेळली.

या सोहळ्यादरम्यान अभिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते, त्यावेळी अमिताभजींनी दोन्ही संघाची भेट घेतली. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्याशिवाय बिग बींनी देखिल त्याच्या अधकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट शेअर करत दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभजींनी मेस्सी आणि रोनाल्डोची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद देखिल साधला आहे. पार पडलेल्या सामन्यात किलियन एम्बाप्पे, सर्जियो रामोस आणि नेमार या दिग्गज खेळाडूंचासुद्धा समावेश असून त्यांनी पीएसजीस कडून सामन्यात सहभाग घेतला होता. सौदी अरेबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारे वाले सलेम अल-दावसारीआणि सऊद अब्दुलहामिद यांनीदेखिल या सोहळ्याला हजेरी लावली.

फिफा विश्वचषकात मेस्सीने अर्जेटिनाला विजयापर्यत नेले आणि सिद्ध करुन दाखवले त्याच्यासारखा तोच खेळाडू आहे. रोनाल्डो देखिल त्या सामन्यामध्ये असू शकला असता मात्र, त्यांचा संघ पूर्वीच्या सामन्यात हारल्यामुळे त्याला ही संधी मिळाली नाही. त्याने नव्या वर्षात नुकतंच जाहीर केलं आहे की, तो अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे. फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती दिली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
साेनम कपूरचा साडीमध्ये धुराळा! पाहणाऱ्याचीही उडेल झोप
इश्क का रंग सफेद! अमृताचे प्रेमात पाडणारे फोटोशूट

हे देखील वाचा