Thursday, February 12, 2026
Home बॉलीवूड ‘आमचे चित्रपट भारताची मोठी पॉवर…’, म्हणत जावेज अख्तर यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल केले मोठे वक्तव्य

‘आमचे चित्रपट भारताची मोठी पॉवर…’, म्हणत जावेज अख्तर यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल केले मोठे वक्तव्य

बॉलिवूड इंडस्ट्री गेल्या अनेक दिवसांपासून मागे पडली आहे.  बिग बजेट चित्रपटदेखिल बॉक्स ऑफिसवर दनक्यात आपटत आहेत त्यामुळे इंडस्ट्रीचा पाया हादरला आहे. 2022 हे वर्ष दाक्षिणात्या चित्रपाटंनीच गाजवलं. त्यांच्यासमोर बॉलिवूडचे सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अशा परिस्थितीत जावेद अख्तर यांनी बॉलवूबद्दल मोठे भाष्य केलं आहे. त्यांच्या मते लेखकांनी बॉलिवूडला बॉयकॉट करुन त्यांनी सतत लिहित रहावं

जावेद अख्तर (Javed Akhtar) हे हिंदी भाषेचे दिग्गज कवी आणि लेखक आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक गाजणारे गाणे लिहिले असून कथाकथनही केले आहे, ते सतत इंडस्ट्रीबद्दल आपले परखड मत मांडत असतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये काम केले असून आपले मोलाचे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी बॉलिवूड चित्रपटांचं जागतिक स्तरावरील महत्त्व सांगितलं आहे.

जावेद अख्तर म्हणाले की, “बॉलिवूडला बॉयकॉट करून काहीही होणार नाहीये. आपला देश चित्रपटभक्तांचा देश आहे. मग ते भारतातील उत्तरेकडची लोक असो वा दक्षिणेकडची किंवा पूर्व-पश्चिम कोणत्याही भागातली असो. आम्हा भारतीयांचं चित्रपटांवर प्रेम आहे. आमच्या डीएनएमध्ये कथा आहे. कथा ऐकणं आणि ऐकवणं हे खूप पूर्वीपासून आमच्या डीएनएमध्ये आहे. आमच्या कथांमध्ये गाणीही आधीपासूनच असायची, आता नव्याने याची सुरुवात झालेली नाही, किंवा हिंदी चित्रपटांनी गाण्यांचा शोध लावलेला नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांचा आदर करा. फक्त हिंदीच नव्हे तर प्रत्येक भारतीय चित्रपटाचा आदर करा.”

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, “आमचे चित्रपट जगभरातील जवळपास 135 देशांमध्ये प्रदर्शित होतात. जगात सद्भावनेचा प्रसार करण्यामध्ये भारतीय सिनेमा मोलाची भूमिका बजावतात. जगभरात हॉलिवूड कलाकारांपेक्षा आमच्या चित्रपटातील कलाकारांना ओळखलं जातं. तो देश श्रीमंत आहे, त्यामुळे त्यांचं बजेट जास्त आहे, हा भाग वेगळा. पण, इजिप्त, जर्मनी अशा कोणत्याही देशात तुम्ही गेलात तर आणि तुम्ही भारतीय आहात, असं सांगितलं की तुम्ही शाहरुख खान (Shaharukh Khan) याला ओळखता का? असा प्रश्न तिथले लोक विचारतात. आमचे कलाकार आणि आमचे चित्रपट भारताची मोठी पॉवर आहेत, त्यामुळे त्यांचं संरक्षण केलं पाहिजे.”

जावेद अख्तरांनी हिंदी चित्रपाटाचं महत्व पटवून देत भारतासाठी किती महत्वाचे आहे हे देखिल पटवून दिलं आहे. त्याशिवाय आपण भारतीय चित्रपाटाचं रक्षण केलं पाहिजे असा मोलाचा सल्ला देखिल प्रेक्षकांना दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजकारणात प्रवेशावर गायक अवधूत गुप्ते म्हणाला, ‘…तेव्हाच राजकारणात येईल’
सलमानचा भाऊ सोहेल खानने गर्दी चिरडून केली अपघतग्रस्त महिलेला मदत, VIDEO व्हायरल

हे देखील वाचा