Saturday, April 18, 2026
Home हॉलीवूड जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमी रुहेलमनचे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन

जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमी रुहेलमनचे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन

जगातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॉडेल जेरेमी रुहेलमनचे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनाच्या बातमीमुळे फॅशनविश्वासह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जेरेमीचा मित्र आणि डिझायनर ख्रिश्चन सिरियानो याने त्याच्या मित्राच्या निधनाची बातमी इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे. जेरेमीचे निधन नक्की कोणत्या कारणामुळे झाले हे अजूनही समोर आलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jeremy Ruehlemann (@ruehlemann)

तत्पूर्वी त्याचा मित्र असणाऱ्या ख्रिश्चन सिरियानो सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जेरेमीच्या निधनाची बातमी दिली आहे. ख्रिश्चन सिरियानोने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी यापूर्वी कधीही असे काहीही पोस्ट केले नाही. मात्र एवढे सुंदर मन आणि हृदय असलेला मित्र गमावणे खरोखर खूप अवघड आहे. जेरेमीने भेटलेल्या प्रत्येकालाच कोणत्याही परिस्थिती फक्त प्रेमच दिले. त्याने मला नेहमीच प्रेरणा दिली आणि मी त्याच्यावर कायम प्रेम करत राहील. ज्यांनी जेरेमीच्या रूपात खास व्यक्तीला गमावले आहे त्या सर्वांना आणि त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना मी माझे सर्व प्रेम पाठवत आहे. मला माहित आहे आपण पुन्हा भेटू. पण आता तुला मला मिठी मारायची आहे. आम्ही प्रत्येक जण तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो…” ख्रिश्चन सिरियानो याने मित्र जेरेमी रुहेलमन याच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Christian Siriano (@csiriano)

जेरेमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता. तो सतत त्याचे फोटो पोस्ट करायचा. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील तुफान आहे. मुख्य म्हणजे जेरेमी रुहेलमनने पेरी एलिस आणि सुपरड्री यांच्यासाठी मॉडेलिंग केले होते. त्याच्या निधनाच्या काही दिवस आधी जेरेमी सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने २० जानेवारी रोजी एक फोटोशूट केले आणि काही फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा