Friday, March 20, 2026
Home वेबसिरीज शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ने भारतात नव्हे तर जगभरातील लोकांना लावले वेड, अभिनेत्याने मानले आभार

शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ने भारतात नव्हे तर जगभरातील लोकांना लावले वेड, अभिनेत्याने मानले आभार

ओटीटी प्लॅटफॉर्मला मिळणारा लोकांचा अमाप प्रतिसाद पाहून अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांना देखील यावर येण्याची भुरळ पडते. आतापर्यंत अनेक मोठमोठे कलाकार या प्लॅटफॉर्मवर आले असून, अजून बरेच कलाकार यंदा यावर पदार्पण करणार आहे. यातच बॉलिवूडचा चॉकलेट हिरो असणाऱ्या शाहिद कपूरने नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दणक्यात पदार्पण केले आहे. त्याची ‘फर्जी’ ही सिरीज प्रदर्शित झाली असून, या सिरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांची निर्मिती असलेली ही सिरीज १० फेब्रुवारीला प्रदर्शित झाली.

शाहिद कपूर राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांची निर्मिती असणाऱ्या ‘फर्जी’ या सिरिजला भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेक देशांमध्ये ही सीरिज टॉप १० मध्ये आली आहे. याबद्दल खुद्द शाहिद कपूरनेच माहिती दिली आहे. शाहिदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामयावरून याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक पोस्ट शेअर केले असून, त्यात विविध देशांमधील टॉप १० सिरीज दिसत आहे. शाहिदच्या या सिरीजने यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर आणि यूएई आदी देशांमध्ये ही सिरीज टॉप १० मध्ये आली आहे. यासोबतच शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिले, “याला म्हणतात सुपरनोट!!! ‘फर्जी’ला दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

फर्जीमध्ये शाहिदने एका कलाकाराची भूमिका साकारली आहे. जो लवकर पैसे मिळवण्याच्या इच्छेमुळे चुकीच्या मार्गावर जातो. तर विजय एका एनफॉर्समेंट ऑफिसरच्या रूपात शेडला शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शाहिद सिरीजमध्ये आपल्या मित्रांना सोबत घेऊन नकली नोटा छापण्याचे काम सुरु करतो आणि एका रात्रींर्ट श्रीमंत होतो. मात्र त्याला यामुळे अनेक मोठ्या समस्यांचा सामना देखील करावा लागतो. या सिनेमात शाहिदसोबत के के मेनन, राशि खन्ना, अमोल पालेकर, रेजिना कैसेंड्रा आणि भुवन अरोडा महत्वाच्या भूमिकेत आहे.

तत्पूर्वी शाहिद कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो लवकरच अली अब्बास जफरच्या ‘ब्लडी डॅड’मध्ये दिसणार आहे. यासोबतच तो निर्माते अमन गिल यांच्या एका सिनेमात देखील दिसणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस १६ नंतर झालेल्या पार्टीमध्ये सलमान खानने केली शिव ठाकरेशी चर्चा, वाचा काय म्हणाला दबंग खान
आता विवेक अग्निहोत्री बनले शारूखचे फॅन, ‘पठाण’चे यश पाहून ‘किंग’वर उधळली स्तुतीसुमने

हे देखील वाचा