Monday, February 2, 2026
Home बॉलीवूड ‘पठाण’च्या निर्मात्यांनी फॅन्सला दिली भेट, चित्रपटाच्या तिकिट खरेदीवर मिळणार ही भन्नाट ऑफर

‘पठाण’च्या निर्मात्यांनी फॅन्सला दिली भेट, चित्रपटाच्या तिकिट खरेदीवर मिळणार ही भन्नाट ऑफर

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर धमाका करत कमाईचे विविध रेकॉर्ड केले आहेत. मोठ्या काळापासून सुन्न झालेल्या बॉक्स ऑफिसला ‘पठाण’मुळे नवीन उभारणी प्राप्त झाली आहे. बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये अडकल्यानंतरही पठाणने धुवांधार कमाई केली आणि अनेकांनी बोलती बंद केली. आता पठाण प्रदर्शित होऊन ३७ दिवस उलटल्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये त्याची घोडदौड यशस्वी चालू आहे. जगभरात १००० कोटींपेक्षा अधिक कमाई केल्यानंतर आता सिनेमाचा वेग जरा मंदावत आहे. यालाच अजून वाढवण्यासाठी पुन्हा एकदा निर्मात्यांनी काही निर्णय घेतले आहे. प्रेक्षकांनी सिनेमा पाहावा यासाठी आता विविध कल्पना आणल्या जात आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहाम यांची मुख्य भूमिका असणाऱ्या पठाणची कमाई अजून वाढवण्यासाठी निर्मात्यांनी एक भन्नाट ऑफर आणली आहे. चित्रपटाच्या एका तिकिटावर दुसरे तिकीट फ्री मिळणार आहे. याआधी या सिनेमाचे निर्माते असणाऱ्या यश राज यांनी सिनेमाच्या तिकिटवर ऑफर आणली होती, ज्यात तिकीट ११० रुपयांना मिळणार होते. हि ऑफर हिट झाली होती. हेच पाहून पुन्हा एकदा नवीन मस्त ऑफर यशराजने प्रेक्षकांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

यशराज कडून त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात लिहिले आहे की, ही एका तिकिटावर दुसरे तिकीट मोफत मिळणारी ऑफर ३ मार्च ते ५ मार्च पर्यंत वैध असणार आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ” येथे ब्लॉकबस्टर पठाण साठी एक मेगा ऑफर आहे…३ ते ५ मार्च पर्यंत १ तिकीट खरेदीवर दुसरे तिकीट मोफत मिळेल. सर्वात आधी येणाऱ्यांना यात प्राधान्य असेल. या ऑफरचं लाभ घेण्यासाठी दर्शकांना कुपन कोड ‘पठाण’चा प्रयोग करावा लागेल.”

तत्पूर्वी २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या पठाणची जादू अजूनही लोकांवर दिसून येत आहे. पठाण समोर कार्तिक आर्यनचा ‘शाहजादा’ आणि अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ देखील फ्लॉप ठरला आहे. जवळपास दीड महिन्यानंतरही या सिनेमा हाऊसफुल जात आहे. भारतात ५०० कोटींपेक्षा अधिकचे कलेक्शन तर भारताबाहेर ५०० कोटींचे कलेक्शन सिनेमाने केले आहे. या कमाईसोबतच सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांनी केली त्यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा, टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सिनेमात दिसणार थलाइवा

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाबद्दल करण्यात आली नारेबाजी; चाहते म्हणाले, ’10 रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर…’

हे देखील वाचा