Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड कियारा अन् सिद्धार्थने हळदीचे फोटो शेअर करत दिल्या होळीच्या शुभेच्छा, दोघांचे खास लूक एकदा पाहाच

कियारा अन् सिद्धार्थने हळदीचे फोटो शेअर करत दिल्या होळीच्या शुभेच्छा, दोघांचे खास लूक एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहे. बी-टाऊनच्या सर्वात लाडक्या जोडप्याचा राजस्थानमधील जैसलमेरमध्ये 7 फेब्रुवारीला शाही विवाहसोहळा पार पडला. तेव्हापासून हे कपल माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अशात पहिल्या हाेळीनिमित्त कियाराने पती सिद्धार्थसोबतचा न पाहिलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना होळीच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कियारा (kiara advani) हिने सिद्धार्थ (sidharth malhotra) आणि तिचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. हे फाेटाे तिच्या हळद समारंभाचे आहेत. फाेटाेमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर हळद दिसत असून दोघेही आनंदाने एकमेकांकडे बघत आहेत. हा फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्याकडून आणि माझ्या प्रेमाकडून तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

फोटोंमध्ये, कियाराने केशरी रंगाचा शरारा परिधान केला असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे, तर सिद्धार्थ मल्होत्रा केशरी रंगाच्या कुर्त्यामध्ये खूप देखना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

या वर्षी 7 फेब्रुवारीला कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचे जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न झाले, ज्यानंतर या जोडप्याने आधी दिल्ली आणि नंतर मुंबईत ग्रँड रिसेप्शनही दिले. सिड-कियाराच्या मुंबई रिसेप्शनला करीना कपूर, नीतू कपूर, आलिया भट्ट, काजोल, अजय देवगण, रणवीर सिंग, विकी कौशल, वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्यासह सर्व बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती.

लग्नाच्या सर्व फंक्शन्सनंतर आता नवविवाहित जोडपे आपापल्या प्रोजेक्टच्या शूटिंगला परतले आहेत. सिद्धार्थ लवकरच दिशा पटानीसोबत अॅक्शन एंटरटेनर ‘योद्धा’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ताे रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. दुसरीकडे, कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तरी ती RC15 मध्ये राम चरणसोबत दिसणार आहे. (bollywood actress kiara advani shared pictures of haldi with husband sidharth malhotra and wished fans holi )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गोपी बहूने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, एकदा व्हिडिओ पाहाच

शिल्पा शेट्टीने कुटुंबासाेबत साजरा केला हाेळीचा सण, पाेस्ट शेअर करत फॅन्सला दिला खास संदेश

हे देखील वाचा