Friday, November 22, 2024
Home नक्की वाचा अभिनेते अमिताभ बच्चन यांनी होळीच्या जुन्या आठवणी शेअर करत सांगितली मनातली गोष्ट; वाचा

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी होळीच्या जुन्या आठवणी शेअर करत सांगितली मनातली गोष्ट; वाचा

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले. त्यांच्या बरगडीला दुखापत झाली. ही बातमी समोर येताच बिग बींच्या चाहत्यांची चिंता वाढली आणि सर्वांनी या शतकातील मेगास्टारसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. चाहत्यांच्या प्रार्थना कामी आल्या आणि सध्या अमिताभ बच्चन यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्वतःच्या प्रकृतीची माहिती दिली आणि ‘मी बरा होत आहे आणि तुमच्या प्रार्थनेने विश्रांती घेत आहे’ असे म्हटले होते. याशिवाय बिग बींनी एक ब्लॉगही लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांना होळीचे जुने दिवस आठवले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या नुकत्याच झालेल्या ब्लॉग पोस्टमध्ये ते पूर्वीप्रमाणे होळी साजरी करू शकत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या तब्येतीच्या स्थितीचे वर्णन करताना, अभिनेत्याने जुने दिवस आठवले, जेव्हा होळीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असे. यासोबतच त्यांनी त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी शेअर केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘घरातील उदास वातावरण आणि सर्व शारीरिक हालचालींवर बंदी असताना होळीच्या सणामध्ये सहभागी होण्यास असमर्थता.. आणि होळीचा आनंद, जो इतक्या उत्साहात साजरा केला जात होता, तो आता हरवला आहे. आणि वर्षानुवर्षे असेच आहे. बिग बींनी पुढे लिहिले, ‘ओपन हाउस..सर्वांचे आनंदाने स्वागत…गाणी, डान्स,आणि शेकडो लोक…सकाळी सुरु होणारी होळी आणि उत्साह.

अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं आहे, ‘कदाचित ती वेळ पुन्हा कधीच येणार नाही..पण मला आशा आहे की ते दिवस येतील..तरीही, हे कठीण वाटतं..किमान सध्या तरी..’ अशा चिंतनाच्या वेळी वडिलांचे शब्द मनात येतात. त्यांची ‘जीवनाच्या चाकाखाली’ ही कविता आठवते. या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना त्यांच्या कामातील गुण-दोषही विचारले आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर पोस्ट शेअर करण्यासोबतच बिग बी नियमितपणे ब्लॉगही करतात. ‘प्रोजेक्ट के’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतर बिग बी सध्या जलसा येथील त्यांच्या घरी आराम करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर , प्रभास, दीपिका आणि अमिताभ यांच्याशिवाय दिशा पटनीही यात आहे. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. (actor-amitabh-bachchan-health-update-share-holi-memories-in-blog)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्या फरदीन खानच्या मागे एकेवेळी दिपीका साईड मॉडेल म्हणून चालली होती, आज त्याच फरदीनला मागे टाकत बनलीय…
वाईट कृत करताना पकडले होते ‘हे’ कलाकार, वर्षानुवर्षे कमावलेली इज्जत एका कृत्याने मिळाली धुळीला

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा