Friday, December 8, 2023

प्रोजेक्ट के सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा गंभीर अपघात, हालचाल करणे झाले अवघड

महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. बिग बी हैदराबादमध्ये एका सिनेमाचे शूटिंग करत असताना ते गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात अमिताभ बच्चन ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाचे शूटिंग करत असताना झाला. या सिनेमासाठी ते एका ऍक्शन सीनची शुटिंग करत होते तेव्हा हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर लगेच शूटिंग थांबवण्यात आले आणि बिग बी यांना उपचारस्ताही रुग्णालयात नेले गेले. हैद्राबादमध्ये उपचार घेतल्यानंतर आता ते मुंबईमध्ये त्यांच्या घरी परतले असून, आराम घेत आहे. त्यांच्या या अपघाताची माहिती स्वतः अमिताभ यांनीच त्यांच्या ब्लॉगमधून दिली आहे.

 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले, “हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक्शन सीन शूट करताना मी जखमी झालो आहे. माझ्या बरगड्यांच्या मांसपेशींना थोडी दुखापत झाली असून, त्यामुळे सिनेमाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. हैदराबादमधील AIG या रुग्णालयामध्ये आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत सीटी स्कॅनही केले आहे. आता मी मुंबईला घरी परतलो आहे. माझ्यावर उपचार करत लागलेल्या ठिकाणी ड्रेसिंग करण्यात आले असून सध्या मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. हो नक्कीच मला वेदना होत आहे. हालचाल करण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील मला त्रास होतोय.”

पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “या अपघातातून मला बरे होण्यासाठी काही आठवड्याचा काळ जाणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. वेदना कमी होण्यासाठी मला काही औषधेही देण्यात आली आहेत. मला जोपर्यंत पूर्ण बरे वाटत नाही तोपर्यंत माझी सर्व कामे पुढे ढकलण्यात आली असून, काही कामे रद्द देखील करण्यात आली आहेत. मी सध्या माझ्या घरी जलसामध्ये आराम करत आहे. मी मला लागणाऱ्या आवश्यक गोष्टींसाठीच थोडीफार हालचाल करत आहे. बहुतकरून मी माझा पूर्ण वेळ आरामच करत आहे.” पुढे त्यांनी त्यांच्या फॅन्सला विनंती करतांना लिहिले, “आज संध्याकाळी जलसाच्या गेटवर मला माझ्या हितचिंतकांना फॅन्सला भेटणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे कृपया कोणीही येऊ नका. जे मला भेटण्याच्या विचार करत आहेत, त्यांनाही कळवा. बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत.”

तत्पूर्वी अमिताभ बच्चन सध्या ठीक असून, त्यांच्या या ब्लॉगनंतर आता सगळीकडूनच त्यांच्या तब्येतीचा विचारपूस होत, त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी सर्वच प्रार्थना करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा