‘मार्वल’च्या सुपरहिरो चित्रपटांचे चाहते संपूर्ण जगात आहे. या चित्रपटांची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. आता पुन्हा एकदा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स त्यांचा पुढचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पुढचा सिनेमा ‘द मार्वलस’ याचवर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. अनेक मार्वल प्रेमी सिनेरसिकांसाठी ही खूपच आनंदाची बाब आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून फॅन्सला या सिनेमाची प्रतीक्षा आहे. फॅन्सची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी हा पहिला टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
द मार्व्हल्समध्ये कॅप्टन मारवेल एकटी नसणार . तर तिच्यासोबत अजून दोन सुपरहिरो असणार आहे. यातील एक मिस मार्वल अर्थात कमला खान आणि दुसरी मोनिका असणार आहे. मार्वल युनिव्हर्सल फॉलो करणाऱ्या लोकांना माहित असेल की, डिज्नी प्लस हॉटस्टारवर मागच्या वर्षी एक सिरीज आली होती, त्यात या मिस मार्वलची ओळख करून देण्यात आली होती. मिस मावळचे खरे नाव कमला खान असून ती कप्तान मार्वलची मोठी फॅन आहे.जेव्हा कमला सुपर वुमन मिस मार्वल बनते तर तिचा लूक आणि गेटअप कॅप्टन मार्वलक्षी मिळत जुळता असतो. द मार्वलस हा सिनेमा या दोन भूमिकानाची भेट घालून देणारा असणार आहे. जेव्हा या दोन भूमिकांची भेट होईल तेव्हा नक्कीच काहीतरी मोठे होणार. द मार्वलस हा सिनेमा येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात टीझरमध्ये भारतीय अभिनेता मोहन कपूर यांची झलक देखील दिसली जे कमला खानच्या वडिलांच्या भूमिकेत आहे.
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हा ३३ वा सिनेमा असून याची दिग्दर्शन निया डिकॉस्टाने केले असून, भारतात हा सिनेमा १० नोव्हेंबर रोजी तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी
भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल










