Thursday, April 2, 2026
Home टेलिव्हिजन “मी चुकीच्या मार्गाला लागले” टीव्हीवरून गायब झालेल्या ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केले ‘फेम’ मिळण्याचे दुःख

“मी चुकीच्या मार्गाला लागले” टीव्हीवरून गायब झालेल्या ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केले ‘फेम’ मिळण्याचे दुःख

मनोरंजनविश्वात काम करणारे कलाकार त्यांच्या कामामुळे तुफान हिट होतात. मात्र या क्षेत्रात असे देखील काही कलाकार आहेत ज्यांना अमाप यश तर मिळाले मात्र तरीही काही कालावधीनंतर ते या इंडस्ट्रीमधून गायब झाले. या यादीत अनेक कलाकार आहेत. या कलाकारांची गायब होण्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी हे कलाकार मात्र नंतर लवकर जगासमोर आले नाही. असाच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री रुपल त्यागी. ‘सपने सुहाने लड़कपन के’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात रुपलला गुंजन म्हणून ओळख मिळाली. आता इतक्या वर्षांनी तिने तिचे दुःख व्यक्त केले आहे.

रुपल केवळ १६ वर्षाची होती जेव्हा ती बंगळुरू वरून मुंबईला आली. अभिनयात येण्याआधी तिने कोरिओग्राफरला सहायक करण्यास सुरुवात केली. रुपलने ‘चुप चुप के’ आणि ‘भूल भुलैया’ चित्रपटांमध्ये विद्या बालन, शाहिद कपूर आणि करीना कपूर आदी कलाकारांना कोरिओग्राफ केले आहे.

रुपलने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिला यश मिळाल्यानंतर तिचे आयुष्य संपूर्णपणे बदलले. रुपलच्या आयुष्यात ‘सपने सुहाने लड़कपन के’ मालिकेला मिळालेल्या यशानंतर तिचे जीवन बदलले. तेव्हा तिला समजले की फेम काय असते? यश काय असते? या शो नंतर लोकं तिला टीव्हीची करीना कपूर म्हणू लागले. आधी बस, ट्रेनने प्रवास करणाऱ्या रुपलने शो नंतर तिने स्वतःची गाडी घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Roopal Tyagi (@roopaltyagi06)

पुढे रुपलने सांगितले की, “या शोनंतर मी माझे यश एन्जॉय करत होती. तेव्हाच आयुष्यात एक वळण आले आणि सर्वच बदलले. सर्व काही ठीक चालू होते, तेव्हा माझ्या आयुष्यात असे काही घडले ज्यामुळे सर्व कायम बदलले. मी ज्या मुलावर जीवापाड प्रेम केले तो त्याच्या एक्सकडे गेला आणि कदाचित तो त्यावेळी आम्हाला दोघींना डेट करत होता. हृदय तर तुटलेच सोबतच सर्वच वृत्तपत्रांमध्ये हे खोट्या गोष्टींसोबत छापले गेले.”

पुढे रुपल म्हणाली, “जे लोकं लोकप्रिय नव्हते ते देखील याबाबत मतं देत लोकप्रिय झाले. तेव्हा मला फेमचा खरा अर्थ समजला. दररोज मी माझ्या ब्रेकअपबद्दल वाचत होती, आणि माझे आईवडील देखील हे वाचून चिंतेत असतील हा विचार करत टेन्शनमध्ये असायची. तेव्हा फेमचा आनंद माझ्या डोक्यातून निघून गेला. अनेकांना त्याचा फायदा घेत लोकप्रियता मिळवली. तेव्हा मी त्या गोष्टींमुळे इतकी चिंतेत होती की, अनेक मोठ्या ऑफर्सला देखील नकार दिला. या लो फेजमुळे मी मित्रांच्या बोलण्यात आली, आणि चुकीच्या गोष्टी करण्यास सुरुवात केली. नंतर मेडिटेशन करून त्यावर काबू मिळवला.”

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

हे देखील वाचा