Tuesday, February 24, 2026
Home बॉलीवूड रणबीरने आलियाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दिले ‘इतक्या’ लाखाचे महागडे गिफ्ट? किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

रणबीरने आलियाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दिले ‘इतक्या’ लाखाचे महागडे गिफ्ट? किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. दोघांनी गेल्या वर्षी 14 एप्रिल 2022 रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. अशात नुकताच दोघांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. यादरम्यान हे जोडपे वांद्रे येथील त्यांच्या बांधकामाच्या साईडवर दिसले. यावेळी चाहत्यांना आलिया भट्टच्या हातात असे काही दिसले, ज्यानंतर त्याची जोरदार चर्चा होत आहे. खरं तर, रणबीरने वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने आलियाला अशी भेट दिली आहे, जी खूप महागडी आहे.

लग्नाचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी रणबीर कपूर (ranbir kapoor) याने त्याच्या लेडी लव्हवर खूप खर्च केला आहे. अलीकडेच रणबीर कपूर विमानतळावर स्लिंग बॅगसह स्पॉट झाला होता, त्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात आहे की, त्याने ती बॅग पत्नी आलिया भट्टसाठी घेतली आहे. कारण, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आलिया भट्टच्या हातात तीच बॅग दिसत आहे. ही गुलाबी रंगाची हँडबॅग पाहिल्यानंतर रणबीरने ही बॅग अभिनेत्रीला गिफ्ट केल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. दरम्यान, एका ऑनलाइन स्टोअरच्या वेबसाईटवर या बॅगची किंमत समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ऑनलाइन स्टोअरनुसार, ही बॅग बकरीच्या कातडीपासून बनलेली आहे. यूएस डॉलर्सनुसार, या बॅगची किंमत सुमारे $12,250 आहे, तर भारतीय रुपयाच्या आधारे या गुलाबी रंगाच्या चॅनेल क्लासिक हँडबॅगची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. मात्र, आलिया भट्टला तिचा पती रणबीर कपूरकडून ही बॅग मिळाली की नाही, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता लवकरच अॅनिमलमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे, आलिया भट्ट रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.(bollywood actor ranbir kapoor gifted 10 lakh rupees handbag to wife alia bhatt on 1st wedding anniversary )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

भाईजानने उघडपणे शहनाज गिलच्या चाहत्यांवर साधला निशाना; म्हणाला, ‘सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेणे बंद करा…’

हे देखील वाचा