Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड खळबळजनक! अभिनेता साहिल खान अडचणीत, महिलेला धमकावणे आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी एफआयआर दाखल

खळबळजनक! अभिनेता साहिल खान अडचणीत, महिलेला धमकावणे आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी एफआयआर दाखल

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता साहिल खान अडचणीत सापडला आहे. साहिलवर एका महिलेने अश्लील कमेंट करणे आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आली आहे. या अभिनेत्यावर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ओशिवरा उपनगरातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याचे फेब्रुवारी 2023 मध्ये एका जिममध्ये पैशावरून एका महिलेशी भांडण झाले होते. आरोपी महिला आणि साहिल खान यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून धमकावले.’

मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा दाखला देत अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपी जोडप्याने तक्रारदार आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट देखील अपलोड केल्या होत्या, ज्यानंतर ओशिवरा येथील महिलेच्या तक्रारीवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांचा समावेश करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

अधिकाऱ्याने असेही सांगितले की, ‘आरोपी महिलेचे फिर्यादीच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिने त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता.’ अभिनेता साहिल खानबद्दल बाेलायचे झाले, तर त्याने आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये ‘स्टाइल’, ‘एक्सक्यूज मी’, ‘अलादीन’ आणि ‘रामा: द सेव्हिअर’ हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. सध्या हा अभिनेता बराच काळ अभिनय जगतापासून दूर असून त्याचा व्यवसाय सांभाळत आहे.(bollywood actor sahil khan for threatening woman at mumbai gym)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची तयारी सलमान खानने केला खुलासा

इरफान खान यांचा शेवटचा सिनेमा असलेल्या ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा