Monday, January 13, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! सामंथाने घातला बुरखा, विजय देवरकोंडाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अशी पोहोचली अभिनेत्री

काय सांगता! सामंथाने घातला बुरखा, विजय देवरकोंडाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला अशी पोहोचली अभिनेत्री

स्टार्सचे एक ना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसे, आजकाल बॉलीवूड स्टार्सपेक्षा साऊथचे स्टार्स जास्त चर्चेत आहेत. अशात आज आम्ही तुम्हाला साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा व्हायरल झालेला व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. खरे तर, विजय देवराकोंडाच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो त्याच्या फॅन पेजने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समंथा रुथ प्रभू बुरखा घातलेली दिसत आहे.

समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) हिला बुरख्यात पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र, हा व्हिडिओ चित्रपटाच्या सेटवरचा आहे. होय, समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा लवकरच ‘खुशी’मध्ये एकत्र दिसणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, सामंथाचा हा लूक तिच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

9 मे रोजी, विजय देवरकोंडा यांने ‘खुशी’च्या सेटवर त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आणि समंथा रुथ प्रभूने हॅपी बर्थडे गाणे गाऊन हा वाढदिवस आणखी खास बनवला. व्हिडिओमध्ये समंथा बुरख्याखाली पिवळा सूट परिधान करून दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री वाढदिवसाचे एक आनंदी गाणे गात आहे.

निर्मात्यांना विजयच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. या गाण्याचे टाइटल ‘ना रोज़ा नव’ असे ठेवण्यात आले आहे. (bollywood actress samantha ruth prabhu wears burqa in viral video of vijay deverakonda birthday celebration at kushi set)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’

सलमानची बहीण अर्पिता पती आयुषसोबत दिसली ‘या’ लूकमध्ये, सोशल मीडियावर लोकांनी केल्या ‘अशा’ कमेंट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा