बंगाली चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. शूटिंगवरून परतत असताना एका बंगाली टीव्ही अभिनेत्रीचा रस्त्यात अपघात होऊन मृत्यू झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शनिवारी (20 मे)ला रात्री सुचंद्र दासगुप्ता एप बाईकवरून शूटिंग करून घरी परतत होत्या. दरम्यान, बारानगर पोलीस ठाण्याच्या घोसपाडाजवळ एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. अशात या अपघातात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे बीटी रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ज्यानंतर पोलिसांनी कसेबसे परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मारेकरी ट्रक चालकालाही अटक केली.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, ‘अभिनेत्री अॅप बाईकवरून घरी परतत होती. यादरम्यान, बडानगर जंक्शनजवळील सिग्नलवर दुचाकीसमोर एक दुचाकी आली आणि दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने सुचंद्र दुचाकीवरून पडली. अशात त्याचवेळी मागून आलेल्या 10 चाकी वाहनाने त्यांना चिरडले. अभिनेत्रीने हेल्मेट घातले असूनही अपघातात हेल्मेटचे तुकडे झाले.
सुचंद्र दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गौरी’मध्ये सह-अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. या मालिकेतून सुचंद्र दास यांना खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय यूट्यूबर अमित मंडल यांचाही अपघाती मृत्यू झाला होता. रस्त्यावरील अपघातात तो प्रथम गंभीर जखमी झाला होता, परंतु नंतर त्याचा मृत्यू झाला.( tv actress suchandra das gupta dies after being hit by a lorry in baranagar )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन










