दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नयनतारा हिचा समावेश होतो. अभिनेत्री नयनतारा कधी वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहते. कधी तिच्या मुलांमुळे, तर कधी चाहत्यांच्या ट्रोलिंगमुळे नयनताराचे आयुष्य चर्चेचा विषय बनते. दुसरीकडे तिची कारकीर्दही खूप मोठी आहे. दरम्यान आता नयनतारा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काय आहे ते कारण, चला तर जाणून घेऊयात…
‘नेत्रिकन’, ‘गॉडफादर’, ‘इरू मुगन’, ‘गोल्ड’ आणि ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणारी नयनतारा (Nayanthara) एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील आहे. नयनताराला आता आणखी एक मोठे यश मिळाले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री नयनतारा आता थिएटर व्यवसायात (Nayanthara Theatre Business) उतरली आहे.
नयनताराने चेन्नईमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तिने उत्तर चेन्नईतील अगस्त्य थिएटरची जुनी इमारत विकत घेतली आहे. अगस्त्य थिएटर हे देवी थिएटर ग्रूपचे होते आणि उत्तर चेन्नईमध्ये 1967 पासून कार्यरत होते. या थिएटरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित केले गेले. जवळजवळ 53 वर्षे हे थिएटर चालल्यानंतर, 2022मध्ये कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे ते बंद करण्यात आले होते.
या थिएटरच्या दुरुस्तीचे काम लवकरच केले जाणार आहे. या थिएटरमध्ये दोन स्क्रीन्स बसवल्या जाणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी हजारो लोक थिएटरमध्ये बसू शकतील. यासोबतच अभिनेत्री नयनतारा तिच्या पतीसोबत प्रोडक्शन हाऊसमध्ये देखील काम करते.
View this post on Instagram
दरम्यान, नयनताराची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासंतास वाट पाहत असतात. नयनतारा भारतीय लूक असो किंवा वेस्टर्न लूक असो, ती प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते. तिचे सौंदर्य प्रत्येक लूकमध्ये चमकते, ज्यामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. दक्षिणेतील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत नयनताराच्या नावाचाही समावेश होतो. अभिनेत्री नयनतारा लवकरच तिच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. (famous actress nayanthara has bought an old theatre in chennai read here)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आरआरआर सिनेमातील ‘या’ दिग्गज कलाकाराचे निधन, राजामौली यांनी पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली
क्या बात हैं! शालीन भनोटच्या आयुष्यात नवीन मुलीची एन्ट्री, नाव विचारल्यावर म्हणाला…