Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, म्हणाली ‘…मी व्हर्जिन आहे?’

स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, म्हणाली ‘…मी व्हर्जिन आहे?’

भारताची किम कार्दशियन म्हणून प्रसिद्ध असलेली ‘कविता भाभी’ फेम अभिनेत्री कविता राधेश्याम तिच्या स्पष्ट अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने एक नवीन विधान करून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

वास्तविक, गोष्ट अशी की, काही काळापूर्वी अनेक ट्रोलर्सने अभिनेत्रीच्या आधीच्या पोस्टवर कमेंट्स करून आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आणि तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर कविताने ट्रोलर्सची तोंडे बंद करत, एक अतिशय बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मित्रांनो, मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नाही आणि मी साखरपुडा केला नाही किंवा माझे लग्नही झाले नाही. कदाचित मी पुढील 5 वर्षात रिलेशनशिपमध्ये येईल. परंतु माझा जोडीदार नक्कीच माझ्यापेक्षा लहान असेल. कृपया माझ्याविषयी काहीही बोलणे थांबवा.”

या पोस्टमध्ये हे स्पष्ट लक्षात आले होते की, तिचे लग्न झाले नाही आणि ती कुमारी आहे. पण अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट पोस्टसह सर्वांना पुन्हा चकित केले आहे. तिने अतिशय हॉट फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये मजेदार अंदाजात लिहिले, “मी असे कधी म्हणाले होते की, मी व्हर्जिन आहे?”

खूप कमी सेलेब्रिटी असे आहेत, जे त्यांच्या व्हर्जिनिटीबद्दल उघडपणे बोलतात, त्यामुळेच अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. मागील पोस्ट आणि या पोस्टवरून तिने तिच्या ट्रोलर्सना योग्य प्रत्युत्तर दिले आहे आणि हेही स्पष्ट केले आहे की, ती विवाहित नाही आणि व्हर्जिनही नाही.

सन २०१२ मध्ये कविताचा एक चित्रपट रिलीझ झाला होता. त्याचे नाव आहे ‘पांच घंटे में पांच करोड़.’ या चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेत्रीचा खूपच बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता. तसेच तिला भारताची ‘किम कार्दशियन’ म्हणूनही संबोधले जाऊ लागले.

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘उल्लू’वर कविताची वेब सीरिज ‘कविता भाभी’ देखील बर्‍याच वादात राहिली. या सीरिजमध्ये ती बरीच हॉट दिसत होती. कविता राधेश्यामने हिंदी चित्रपटांसोबतच कन्नड, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीला क्वीन ऑफ वेब सीरिजचा दर्जा मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! चौदा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

-काय सांगता! करन-अर्जुनमधील शाहरुखची प्रेयसी झालीय साध्वी, बॉलीवूडला ठोकलाय कायमचा राम-राम

-अरे ही तर आपली दिशा! दिशा पटानीचे जुने फोटोज व्हायरल…

हे देखील वाचा