Friday, December 1, 2023

अरे ही तर आपली दिशा! दिशा पटानीचे जुने फोटोज व्हायरल…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने फार कमी वेळात खूप मोठं यश संपादित केलं आहे. अर्थात यात तिची मेहनत आणि तिची जिद्द आहेच. दिशाला पाहताच तिचे चाहते हे घायाळ होत असतात. दिशाचे इन्स्टाग्रामवर 58 मिलियन फॉलोअर्स आहेत. या तिच्या छायांचित्रांसाठी दिशा नेहमीच तिचे वेगवेगळ्या वेशभूषांमधले फोटोज अपलोड करत असते.

तिचे हे सुंदर सुंदर फोटोज खूप व्हायरल होत असतात. पण सध्या दिशाच्या चाहत्यांसाठी एक खास खबर आहे. याचे कारण इंस्टाग्रामवर एका पेजवर दिशाचे जुने साडीतील फोटोशूट व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोजमधून तिला ओळखताही येत नाहीये. यावरूनच आपल्याला दिसून येतं की दिशाने स्वतःचा किती मेकओव्हर केला आहे.

एका जुन्या फोटोमध्ये दिशा पटानी जांभळ्या रंगाच्या साडीत पोज देताना दिसतेय. हा फोटो दिशा पटानीच्या पहिल्या फोटोशूटचा आहे, जेव्हा ती फक्त १७ वर्षांची होती. या फोटोंमधून दिशा पटानीला ओळखणही अवघड वाटत आहे. दिशा पटानीच्या फॅन पेजने तिचे हे फोटोज इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. याशिवाय दिशा पटानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही जुने फोटोज आहेत, ज्यात तिचा लूक आणि स्टाईल खूपच वेगळी दिसतेय.

दिशा पटानी हिने सुशांत सिंह राजपूत स्टारर एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला आणि बॉलिवूडमध्ये दिशाच्या या अभिनयाला खूप वाहवा मिळाली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण हा पुरस्कार देखील मिळाला.

यानंतर दिशाने थेट चायनीज सिनेमापर्यंत मजल मारली. कुंग फु योगा या २०१७ साली आलेल्या सिनेमात ती सुप्रसिद्ध चायनीज हिरो जॅकी चॅन याच्यासोबत झळकली होती. या सिनेमात सोनू सूद देखील खलनायकाच्या भूमीकेत झळकला होता. यानंतर तिने बाघी २ मध्ये टायगर श्रॉफ सोबत तर भारत सिनेमात सलमान खानसोबत काम केलं. याच वर्षाच्या सुरुवातीला तिचा आदित्य रॉय कपूर सोबतचा मलंग हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि तुफान चालला देखील होता.

हे देखील वाचा