Thursday, March 19, 2026
Home बॉलीवूड ‘पंगा क्वीन’ला मोठा दणका! कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट निलंबित, बंगाल हिंसाचारावर सातत्याने करत होती ट्विट्स

‘पंगा क्वीन’ला मोठा दणका! कंगना रणौतचं ट्विटर अकाउंट निलंबित, बंगाल हिंसाचारावर सातत्याने करत होती ट्विट्स

‘पंगा क्वीन’ कंगना रणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. सतत देश-विदेशातील मुद्द्यांवर ती आपले मत मांडताना दिसते. अलीकडेच ‘ऑक्सिजन’ बद्दल मत मांडल्यानंतर, आता तिने बंगाल विधानसभा निवडणुका २०२१ वरही आपले मत व्यक्त केले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा विजय झाल्यानंतर कंगनाने अनेक ट्वीट केले. आपल्या पोस्टमध्ये तिने ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत आणि बंगालच्या हिंसाचाराविरोधातही वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. या कारणामुळे, लगेचच कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर कंगना रणौत, बहुतेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ भाष्य करताना दिसते. आता ती पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबद्दल, टीएमसीवर टीका करत ट्वीट करत होतीे. काही काळापूर्वी तिने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले होते, “मी चुकीची होते, तो रावण नाहीये. तो तर एक उत्तम राजा होता, त्याने जगातील सर्वोत्तम देश बनविला. एक महान प्रशासक, एक विद्वान होता आणि तो एक वीणावादक आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती तर रक्तपात करणारी एक राक्षसी ‘ताडका’ आहे. ज्यांनी तिला मतदान केले, त्यांचे हात देखील रक्ताने माखलेले आहेत. #BengalViolence.”

कंगनाने या पाठोपाठ दुसरे ट्विट केले, ज्यात तिने टीएमसी कामगारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला. तिने ट्वीट करत लिहिले, “टीएमसीच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यावर बलात्कार केला. इंदिरा गांधींनी ३९ वेळा आणीबाणी लागू केली आणि त्या म्हणाली होत्या आंतरराष्ट्रीय मीडिया, भारत तुमच्या विचारांची पर्वा करत नाही. हे अडाणी प्रेमाने सांगणाऱ्या मोदींची भाषा ऐकत नाहीत, त्यांना काठीच लागते.”

तसेच, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक २०२१ चा निकाल लागल्यानंतर, तिथून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहेत, असा भाजपचा दावा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

-‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट

हे देखील वाचा