Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात रजनीकांतने बिग बींच्या चरणांना केला स्पर्श, व्हिडिओ व्हायरल

अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात रजनीकांतने बिग बींच्या चरणांना केला स्पर्श, व्हिडिओ व्हायरल

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह झाला. 13 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाचा एक भव्य शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. आशीर्वाद सोहळ्यात अनेक स्टार्स सहभागी झाले होते. रजनीकांत (Rajinikanth) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रजनीकांत पत्नी लता रजनीकांतसोबत कार्यक्रमात पोहोचले. बिग यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा आणि जावई निखिल नंदा यांच्यासोबत आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रजनीकांत त्यांच्या पत्नीसह अमिताभ बच्चन यांच्या जवळ येतात आणि त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी वाकताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये रजनीकांत बिग बींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकतात. अमिताभ बच्चन त्याला हळूच थांबवतात आणि मिठी मारतात. यानंतर दोघांनी हस्तांदोलन केले आणि प्रेमळ चर्चा केली. यादरम्यान बिग बी निळ्या रंगाच्या कुर्त्यात खूपच सुंदर दिसत होते, ज्यावर अनेक रंगांची नक्षी होती. पांढऱ्या कुर्ता आणि धोतीमध्ये रजनीकांत पारंपरिक स्टाईलमध्ये दिसले.

दोन्ही स्टार्समधील संभाषणातून त्यांच्यातील परस्पर आदर आणि मैत्री दिसून आली. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी 32 वर्षांपूर्वी ‘हम’ चित्रपटात शेवटचे एकत्र काम केले होते, जो खूप हिट ठरला होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, राजकीय व्यक्ती आणि आंतरराष्ट्रीय तारे उपस्थित होते. अनंत आणि राधिकाचे १२ जुलै रोजी मुंबईत लग्न झाले. लग्नातही अनेक स्टार्स थिरकताना दिसले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भूमिकन्येची लगीनघाई, रविवार १४ जुलैला सोनी मराठी वाहिनीवर विशेष भाग रंगणार
अमिताभ बच्चन यांनी अक्षय कुमारला दिला होता मोलाचा सल्ला, अभिनेता आजही पाळतो

हे देखील वाचा