बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा चौथा आठवडा सुरु झाला आहे. या सिझनमध्ये जान्हवी किल्लेकर सुरुवातीपासून तिच्या वादग्रस्त विधानांसाठी आणि खेळासाठी प्रसिद्ध आहे. मागे एकदा जान्हवीने वर्षा उसगावकर यांच्याशी जोरदार वाद घातला होता. त्याव्यतिरिक्त देखील जान्हवी अनेकदा चुकीच्या भाषेत घरातील सदस्यांशी भांडताना दिसते. भाउच्या धक्क्यात रितेश देशमुखने तिला सुनावले देखील होते. मात्र आता पुन्हा एकदा जान्हवीने पंढरीनाथ कांबळे याच्याशी बोलताना पातळी ओलांडली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या टास्क मध्ये जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा जोकर म्हणून उल्लेख केला.त्यानंतर तिने पंढरीनाथला त्याच्या कामावरून आणि अभिनयावरून देखील हिणवलं.”पॅडीदादाच्या अंगात काहीतरी घुसलय. आयुष्यभर ओव्हरॲक्टिंग करून दमले, आता तीच ओव्हरॲक्टिंग घरात करत आहेत”. असं जान्हवी पॅडीविषयी म्हणाली.
जान्हवीच्या या बोलण्यानंतर तिला युजर्सनी खूप ट्रोल केलंय. अनेक सेलिब्रिटी तिच्या विरोधात पोस्ट करत आहेत. अनेकांनी पॅडीला सपोर्ट केला आहे. या सगळ्या गदारोळानंतर जान्हवीचा पती किरण किल्लेकर याने जान्हवीला सपोर्ट केला आहे. त्याने जान्हवीची बाजू मांडणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे.
जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही. पण, जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली.
याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे. ‘बिग बॉस’चं घर साधं घर नाही. तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असं ही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही.
लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची… बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी या बाईचा १ दिवस पाणउतारा करेन. अंकिता बोलते हिच्या मध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श… तेव्हा वर्षा ताई सिनिअर नव्हत्या म्हणजे?
जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण, तिने नंतर वर्षा ताईंची माफी मागून त्यांची सेवा केली. हे फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा, २४ तासांच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती १ तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. ‘बिग बॉस’चा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस्स बोलायला खूप आहे. पण, जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेछा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो.
मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळुहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.
जान्हवी साठी तिच्या पतीने केलेली हि पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे. आता प्रेक्षक कुणाची बाजू घेतात हे बघण्यासारखे असेल
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच का ? मुकेश छाब्रा यांनी दिले उत्तर…