आजकाल समाजात एआयचा विस्तार वाढत चालला आहे. याचा वापर लोक चांगल्या कामांसाठी कमी आणि वाईट कामांसाठी जास्त करत आहेत. अनेक कलाकारांचे खोटे व्हिडिओ आणि फोटो तयार केले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan)हिचे देखील खोटे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत आणि याबद्दलच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून सतर्कतेचा इशारा दिला आहे .
विद्या बालनने एआय वापरून तयार केलेल्या तिच्या बनावट व्हिडिओचा एक नमुना इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यासोबतच एक मोठा मेसेजही लिहिला आहे ज्यामध्ये विद्या लिहिते की, “सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत ज्यामध्ये मी दिसत आहे. पण मी हे स्पष्ट करू इच्छिते की हे व्हिडिओ एआयने तयार केले आहेत आणि ते पूर्णपणे चुकीचे आहेत.”
विद्या बालन तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिते की, “हे बनावट व्हिडिओ बनवण्यात आणि शेअर करण्यात माझा कोणताही सहभाग नाही. तसेच, जे सांगितले गेले आहे त्याचे मी समर्थन करत नाही. बनावट व्हिडिओमध्ये केलेल्या कोणत्याही दाव्यांशी माझा काहीही संबंध नाही. हे माझे विचार प्रतिबिंबित करत नाही. असे व्हिडिओ आणि माहिती शेअर करण्यापूर्वी पडताळणी करा. अशा चुकीच्या व्हिडिओंपासून सावध रहा.”
२०२४ मध्ये विद्या बालन दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. एक चित्रपट ‘दो और दो प्यार’ होता, तर ‘भूल भुलैया 3’ मध्ये ती माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनसोबतही दिसली होती. या वर्षीही ती काही प्रकल्पांचा भाग बनत आहे, ज्यांची माहिती अद्याप शेअर केलेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अनेक वर्षांनी दुलकर सलमान करतोय मल्ल्याळम सिनेसृष्टीत पुनरागमन; नव्या सिनेमाची घोषणा…
उदित नारायण यांना माझी कॉपी करायची आहे; किसिंगच्या वादात मिका सिंगने घेतली उडी…