हल्ली नेटकरी कोणता मुद्दा उचलून धरतील आणि कुणाला ट्रोल करतील याचा काही नेम नाही. ट्रोलर्स जणू वाटच पाहत असतात की कधी कोणता मुद्दा मिळतोय आणि एखाद्या व्यक्तीला ट्रोल करायला मिळतंय. एखादा मुद्दा मिळाला, प्रसिद्ध व्यक्ती असली की बनव मिम्स आणि करा ट्रोल! परंतु आपल्याला ठाऊक आहे का की एक व्यक्ती ही ट्रोलर्स च्या निशाण्यावर कायम असते ती म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा!
विराट कोहलीचा क्रिकेट मध्ये बॅड पॅच आला, कर्णधार म्हणून त्याने घेतलेले निर्णय चुकले, एखादा सामना गमावला , एखादी सिरीज गमावली की ट्रोलर्स याला जबाबदार विराटला नाही तर अनुष्काला ठरवतात. हे सगळं तर आपल्याला ठाऊक असेलच पण आपण म्हणाल आता काय झालं की अनुष्का पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. चला आज या प्रकरणावर एक नजर टाकूयात.
ऍडिलेड येथील ओव्हल मैदानावर बॉर्डर गावस्कर कसोटी चषकाच्या पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्याच्या तिसर्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा आठ गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. नेटकरी मोठ्या प्रमाणात अनुष्काला ट्रोल करत आहेत आणि भारतीय संघाच्या पराभवाचा दोष तिला देत आहेत. आपल्याला सांगायचं तर अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या गर्भवती असून ती भारतातच आराम करतेय. हे सगळं प्रकरण सुरू कसं झालं हे आता पाहुयात.
जेव्हा भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता त्या आधीच बीसीसीआय काढून ही घोषणा करण्यात आली होती की, कर्णधार विराट कोहली हा पहिला डे-नाईट कसोटी सामना झाल्यानंतर अनुष्काच्या प्रसूतीसाठी भारतात परतणार आहे. उर्वरित तीन सामन्यांसाठी विराट उपलब्ध नसेल. झालं सर्वांचं लक्ष बारकाईने विराटच्या खेळीकडे आणि भारताच्या यशापयशाकडे लागलं होतं. आणि ज्याची भीती होती तेच झालं. आधीच चाहते विराट उपलब्ध नाही म्हणून नाराज त्यात पहिला सामना भारताने गमावला. पराभवाबद्दल कुणाचं काही म्हणणं नाही परंतु ज्या पद्धतीने पराभव झाला यावर सगळे चाहते नाराज आहेत. याला कारणही तसंच आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ हा फक्त ३६ धावांमध्ये सर्वबाद झाला. दुष्काळात तेरावा महिना यावा तसा मोहम्मद शमी देखील दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला. आता या सगळ्याचं खापर हे विराट वर फोडलं जात आहे. आणि इतका दारुण पराभव होऊन सुद्धा विराट भारतात परत येणार आहे त्यामुळे लागलीच अनुष्कावर देखील लोकांनी तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. इतकंच काय काहींनी तर विराटने कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा कारण त्याला राष्ट्रीय हितापेक्षा परिवार जास्त महत्त्वाचा आहे अशीच मागणी केली.
https://twitter.com/rahejatin/status/1340292666047623169?s=20
Whenever Indian Cricket team looses a match Anushka Sharma starts trending on twitter.
Le Anushka Sharma : ????#Anushka#INDvAUS pic.twitter.com/ZguGTqmnl2
— Rajeev Rajput (@sarif_zada_) December 19, 2020
Anushka : Virat! Come home dinner is ready ????
Virat : Wait! Let me finish the match (IND 36/9)"Jaldi-Jaldi m to RCB ka lowest record v break ho gya"
???????? #viratkholi #Anushka #INDvAUS pic.twitter.com/nTnZkFvkos— Rajan | The Morgenstern (@the__White_Wolf) December 19, 2020
या सर्व क्रिकेटच्या भानगडींमध्ये अनुष्काला मध्ये खेचणं आणि तिला ट्रोल करणं हे चुकीचंच आहे परंतु या नेटकऱ्यांना हे कोण सांगणार? आपल्याकडे क्रिकेट म्हणजे धर्म आहे आणि या क्रिकेटर्सची सर्व व्हाहते अक्षरशः भक्ती करतात. त्यांच्यावर इतकं प्रेम करतात की पराभव झाल्यास हक्काने नाराज देखील होतात. असो जेव्हा विराटला एक गोंडस बाळ होईल तेव्हा त्याच्यावरचा चाहत्यांचा हा राग निवळून देखील जाईल.