Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड बॉर्डर 2 ओटीटी रिलीज: थिएटरनंतर ओटीटीवर ‘बॉर्डर 2’ची दहशत, सनी देओलचा वॉर-ड्रामा कुठे पाहता येणार?

बॉर्डर 2 ओटीटी रिलीज: थिएटरनंतर ओटीटीवर ‘बॉर्डर 2’ची दहशत, सनी देओलचा वॉर-ड्रामा कुठे पाहता येणार?

अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला वॉर ड्रामा ‘बॉर्डर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घालत आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले असून, तो आता 300 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

‘बॉर्डर 2’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 286 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मागील दोन दिवसांत कमाईत थोडी घट पाहायला मिळाली असली, तरी येत्या वीकेंडला पुन्हा एकदा कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही हा चित्रपट अनेक सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्ल चालत असून प्रेक्षकांचा उत्साह कायम आहे.

सिनेमागृहांमध्ये यशस्वी कामगिरी करत असतानाच, ‘बॉर्डर 2’च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा वेगाने सुरू झाल्या आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या आधी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या डिजिटल हक्कांवर नेटफ्लिक्सचा अधिकार असल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बॉर्डर 2’ 20 मार्च 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, प्रेक्षकांना ओटीटीवर हा चित्रपट पाहण्यासाठी अजून सुमारे दीड महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.

बॉर्डर 2’ने (Border 2)ओपनिंग डे ला 30 कोटींची जबरदस्त कमाई केली होती. त्यानंतर वीकेंडला कलेक्शनमध्ये मोठी उडी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, रिलीजच्या चौथ्या दिवशी तब्बल 59 कोटींची कमाई करून चित्रपटाने सगळ्यांनाच चकित केले. आत्तापर्यंतचा एकूण कलेक्शन 286 कोटींहून अधिक असून, लवकरच हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ यांच्यासह मोना सिंह, अनन्या सिंह, मेधा राणा आणि सोनम बाजवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार अभिनय आणि देशभक्तीपर कथा यामुळे ‘बॉर्डर 2’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

इक्का: सनी देओल–अक्षय खन्ना एकत्र येताच सोशल मीडियावर खळबळ; ‘तारा सिंग vs रहमान डकैत’ ट्रेंडमध्ये

हे देखील वाचा