२०२४ मध्ये विक्रांत मेस्सीने (Vikrant Messy) सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर तो अभिनयातून निवृत्ती घेणार असल्याचा अफवांना उधाण आले होते. अशातच आता विक्रांतने निवृत्तीच्या अफवांवर भाष्य केले आहे. त्याने असे सांगितले की. त्याने केलेल्या पोस्टचा अर्थ लोकांना नीट समजला नाही आणि त्यांचा गैरसमज झाला आहे.
अभिनेता विक्रांत मेस्सीने स्पष्ट केले की डिसेंबर २०२४ मधील त्याची पोस्ट निवृत्तीबद्दल नव्हती. उलट, ती एक आवश्यक विश्रांती होती, जी तीव्र बर्नआउट आणि कुटुंबासोबत वेळ न घालवल्याबद्दल पश्चात्तापामुळे घेतली गेली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टबद्दल बोलताना, अभिनेता म्हणाला, “X वर शब्दांची मर्यादा आहे, म्हणून मी कमीत कमी शब्दात माझे म्हणणे मांडण्याच्या पर्यटन केला. पण ती माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. लोकांना खूप गैरसमज झाला. मला फक्त ब्रेक घ्यायचा होता. त्यावेळी मला खूप थकवा येत होता. जर तुम्ही तुमच्या कामामुळे क्षणांचा आनंद घेऊ शकत नसाल तर यशाचा काय अर्थ आहे?”
अभिनेत्याच्या मते, त्याच्या मुलाने त्याला पहिल्यांदा “पापा” हाक मारली तो क्षण त्याला आठवला. यामुळे त्याला जाणीव झाली की व्यावसायिक कामगिरी तात्पुरती आहे, परंतु त्याच्या मुलाचे बालपण कधीही परत येणार नाही. सात महिन्यांच्या विश्रांती दरम्यान, त्याने पती आणि वडील म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तो म्हणाला, “काम वाट पाहू शकते, पण कुटुंबासोबत घालवलेले क्षण कधीही परत येत नाहीत.”
सध्या, विक्रांत विशाल भारद्वाज यांच्या रोमँटिक थ्रिलर “ओ रोमियो” मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. तो नेटफ्लिक्सच्या आगामी मालिकेत “मुसाफिर कॅफे” मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










