Monday, March 9, 2026
Home हॉलीवूड स्वतःच्या शोधात अडकला शास्त्रज्ञ, हा ओटीटीवरील सस्पेन्सफुल चित्रपट पाहून व्हाल थक्क

स्वतःच्या शोधात अडकला शास्त्रज्ञ, हा ओटीटीवरील सस्पेन्सफुल चित्रपट पाहून व्हाल थक्क

आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक प्रकारच्या कंटेंट मधील चित्रपट सिरीज घरबसल्या प्रेक्षक पाहू शकत आहे. तसेच प्रत्येक आठवड्याला नवीन कंटेंट हा येत असतो. आणि अशीच एका जबरदस्त चित्रपटाबद्दल आम्ही सांगू ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 2 तास 30 मिनिटांच्या हा चित्रपट आहे. थेटर मधील उत्तम प्रतिसादानंतर, ओटीपी वर सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला हा चित्रपट 2025 थेटर मध्ये आला होता तर या चित्रपटाचे नाव आहे “फ्रैंकेंस्टाइन”. तर हा चित्रपट एका विलक्षण शास्त्रज्ञाची कथा सांगतो.

2025 च्या “फ्रैंकेंस्टाइन” चित्रपटाचा संदर्भ देत, कथा व्हिक्टर फ्रैंकेंस्टाइनभोवती फिरते, जो एक अहंकारी शास्त्रज्ञ आहे जो मृत लोकांच्या अवयवांचा आणि विजेचा वापर करून नवीन जीवन निर्माण करतो. मात्र, त्याच्या प्रयोगांचे परिणाम अत्यंत धोकादायक आहेत. शरीराला नवीन जीवन दिल्यानंतर, तो त्याने निर्माण केलेल्या भयानक प्राण्याला घाबरतो. समाजाच्या नकार, नापसंतीमुळे अस्वस्थ झालेला हा राक्षस त्याच्या निर्मात्यावर सूड घेण्यास तयार होतो. या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम मनमोहक आहे.

जर तुम्हाला हा अद्भुत चित्रपट पहायचा असेल, तर तुम्ही OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर त्याचा आनंद घेऊ शकता. हा चित्रपट 2 तास 30 मिनिटांचा आहे, परंतु त्याची खासियत अशी आहे की तो प्रेक्षकांना कधीही कंटाळवाणा करत नाही. तर कथेशी जोडुन ठेवते.  IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 7.4 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तर नोव्हेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. मेक्सिकन, गिलेर्मो डेल टोरो दिग्दर्शित या चित्रपटात जेकब एलोर्डी, मिया (Miya)गॉथ, ऑस्कर आयझॅक, चार्ल्स डान्स आणि फेलिक्स कॅमेरर यांच्या भूमिका आहेत. जेकब एलोर्डीने क्रिएचरची भूमिका केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा ग्लॅमरस लूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा