अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरविरुद्धच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सरकारी साक्षीदार होण्याची मागणी केली होती. तिने गेल्या महिन्यात न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र, अंमलबारी संचालनालयाने (ईडी) या फसवणुकीत अभिनेत्री समान भागीदार असल्याचे सांगत तिच्या याचिकेला विरोध केला आहे.
ईडीने जॅकलिनच्या याचिकेला विरोध केला आणि म्हटले की ती पीडित नाही. तिला त्या ठगाच्या भूतकाळाची जाणीव होती, तरीही तिने भेटवस्तू स्वीकारल्या. सुकेश चंद्रशेखरचा गुन्हेगारी इतिहास माहीत असूनही ती त्याच्या संपर्कात राहिली. ईडीने म्हटले की, जॅकलिनला साक्षीदाराचा दर्जा देणे हा न्यायाचा विपर्यास ठरेल आणि त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य कमी होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
तेलगू अभिनेते के. भरत कांत आणि सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचा एका भीषण कार अपघातात मृत्यू










