Wednesday, May 20, 2026
Home साऊथ सिनेमा ‘ड्रॅगन’ ’मधील Jr. NTRचा फर्स्ट लुक समोर, 4 मिनिटे 28 सेकंदांच्या टीझरमध्ये दिसला खतरनाक अंदाज

‘ड्रॅगन’ ’मधील Jr. NTRचा फर्स्ट लुक समोर, 4 मिनिटे 28 सेकंदांच्या टीझरमध्ये दिसला खतरनाक अंदाज

नंदामुरी तारका रामाराव म्हणजेच दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांचा आज 43 वा वाढदिवस आहे. तर ज्युनियर एनटीआरने त्याच्या अभिनयाने त्यांने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. तसेच दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या निमित्ताने अभिनेता आणि त्याच्या चाहत्यांना एक अद्भुत भेट दिली आहे. ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशीच त्यांच्या ‘ड्रॅगन’ या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर हे सुपरस्टार आणि त्याच्या चाहत्यांना हे सरप्राईज निर्मात्यांनी मध्यरात्री दिले आहे. तर या चित्रपटाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत.क

‘ड्रॅगन’ या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत अनिल कपूर (Kapoor)देखील आपल्याला दिसणार आहेत. तर या या फर्स्ट लूक टीझरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टारला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लूकमध्ये दाखवण्यात आले आहे. त्याच्या या प्रभावी लुकमुळे आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये ज्युनियर एनटीआरचा रागीट भाव आणि धोकादायक वृत्ती पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अनिल कपूर सोबत, रघुवीर राठोड देखील दिसणार आहेत.  ड्रॅगनच्या कलाकारांबद्दल सांगायचे तर, ज्युनियर एनटीआर आणि अनिल कपूर व्यतिरिक्त, रुक्मिणी वसंत, खुशबू सुंदर, बिजू मेनन, गुरु सोमसुंदरम, आशुतोष राणा, राजीव कनकला, प्रभास श्रीनू, शिवा, जीत ओबेरॉय आणि सिद्धांत गुप्ता सारखे कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. तर हा चित्रपटात 11 जुन 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

हेही वाचा

अमिताभ बच्चन आजारी आहेत का? रात्री X वर शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

हे देखील वाचा