Monday, June 15, 2026
Home टेलिव्हिजन छावामध्ये काम केलेली संचित उगले नक्की कोण होती? टेलिव्हिजनवर देखील केलंय काम

छावामध्ये काम केलेली संचित उगले नक्की कोण होती? टेलिव्हिजनवर देखील केलंय काम

टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले (sanchita ugale)हिचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. अवघ्या १९ तासांपूर्वीच, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्या खूप आनंदी दिसत आहेत.

संचिता उगले एक उदयोन्मुख अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागळे की दुनिया’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. त्या ‘दिलवाली दुल्हा ले जाएंगे’ या शोमध्येही दिसल्या होत्या, जिथे त्यांनी सुकूनची भूमिका साकारली होती. ‘कुमकुम भाग्य’मुळे त्यांना मोठी ओळख मिळाली.

टीव्ही मालिकांव्यतिरिक्त, संचिता हळूहळू मोठ्या पडद्याकडे वळत होत्या. त्या विकी कौशल अभिनीत २०२५ च्या ‘छावा’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी ताराबाईंची भूमिका साकारली होती.

संचिता दंगल टीव्हीच्या ‘साजन घर’ या मालिकेतही दिसली होती, जिथे तिने पूजाची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावरही संचिताचा मोठा चाहतावर्ग होता, केवळ इंस्टाग्रामवरच तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स होते.

फिल्मी बीटच्या वृत्तानुसार, संचिताने ‘छावा’मध्ये काम करण्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाली, “या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. इतकी महत्त्वाची आणि सुंदर भूमिका साकारणे हा एक आशीर्वाद होता आणि मी हे आयुष्यभर लक्षात ठेवीन. इतक्या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करणे हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव होता. या भूमिकेसाठी मला सोशल मीडियावर खूप प्रशंसा मिळाली आणि त्यातून मला प्रेरणा मिळते.” संचिताने ‘सायलेन्स २’ मध्येही काम केले आहे.

हेही वाचा

अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या, नालासोपाऱ्यात राहत्या घरी घेतला गळफास

हे देखील वाचा