Wednesday, July 29, 2026
Home टेलिव्हिजन ‘लॉकअप 2’मध्ये तिसरे गुपित उघड करण्यासाठी का घाबरली आकांक्षा, घ्या जाणुन

‘लॉकअप 2’मध्ये तिसरे गुपित उघड करण्यासाठी का घाबरली आकांक्षा, घ्या जाणुन

नेटफ्लिक्स वरील ‘लॉकअप 2’ हा शो सध्या खुप चर्चेत आहे. त्यातील कलाकार आणि या शो मधील वेगळ्या टास्कमुळे ते सध्या चर्चेत येत आहेत. नुकताच या शो मधुन बाहेर 2 स्पर्धक पडले आहेत. तर इतर दोघे यात परतले आहेत. एका टास्क दरम्यान धीरज धूपर आणि सुफी मोतीवाला बाहेर पडले, तर हर्षद चोप्रा आणि योगेश रावत परतले. हे दोन स्पर्धक परतल्यानंतर स्पर्धकांची गुपिते उघड करण्याचा सीझन पुन्हा सुरु झाला आहे. राम कपुर, शिल्पा आणि श्रेया यांनी त्याच्या आयुष्याची गुपीत उघड केल्या नंतर आकांक्षा खुप घाबरलेली दिसली.  

आकांक्षाला भीती आहे की, जर तिचे तिसरे गुपित उघड झाले, तर तिला ‘सार्वजनिक मारहाणी’ला सामोरे जावे लागू शकते. कारण तीने आतापर्यत दोन गुपीत समोर केले आहेत. जे ती बायसेक्शुअल आहे. आणि ती खुप दिवसापासुन तिच्या पती पासुन वेगळी राहत आहे. आणि आता हे तिसरं गुपित मी जर उघड केले तर गौरव खन्नाच्या चाहत्यांकडून आणि त्याच्याशी संबंधित असलेल्यांकडून तीव्र विरोधाला सामोरे जावे अशी भिती तिला वाटत आहे.

सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावक व्हायरल होत आहे. आकांक्षा श्रेयाला म्हणते. मी एवढंच सांगते की, हे सहस्य कोणाला सांगु नको माझा विश्वास तोडु नको, मात्र श्रेयाच्या (shreya)मते जर इतर कोणी आकांक्षाचे रहस्य उघड केले नाही, तर ती स्वतःच ते उघड करेल. तसेच श्रेया असेही म्हणते की, ती आंकक्षाला आपली मैत्रीण मानत नाही.

आकांक्षा म्हणते की, जर हे गुपित, गुपित राहिले नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो कारण या रहस्याचा परिणाम फक्त या शो पुरता मर्यादित राहणार नाही. तिचा नवरा एक प्रसिद्ध अभिनेता असल्यामुळे या वादामुळे सार्वजनिक प्रतिमेवर त्याच्या परिणाम होऊ शकतो तसेच दोघांनाही लोकांच्या रागाला सामोरे जावे लागेल आणि आमचे कुटुंब ही आम्हाला वाळीत टाकेल.

लवकरच येणार मॉम 2, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

 

हे देखील वाचा