अवारपन हा ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 2007 आला होता. तर या चित्रपटांचा सिक्वेल आता येत आहे. आणि आता याचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये इम्रान हाश्मी हा पुन्हा एकदा शिवम पंडित या रोल मध्ये दिसणार आहे. त्याच्या यातील दमदार लुकने चाहते आता या चित्रपटासाठी अजुन उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट नितीन कक्कर दिग्दर्शित असुन यात इम्रानसोबत दिशा (deesha)पटानी आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत आहेत.
अवारपन 2 याचा ट्रेलर सुमारे 1 मिनिट 25 सेकंदांचा आहे. ट्रेलरची सुरुवात शिवम पंडितच्या (इम्रान हाश्मी) एका नवीन, अधिक आक्रमक रूपाने होते, जो एका विशिष्ट उद्देशाने परत आला आहे. यावेळी, दिशा पटानी चित्रपटात एका वेगळ्या अवतारात दिसत आहे, जिथे ती जड शस्त्रांनी सज्ज असून दमदार स्टंट्स आणि भरपुर ऍक्शन करताना दिसते. तर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या चित्रपटात मुख्य खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.
‘अवारपन 2’ या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने “U/A 16+” प्रमाणपत्र दिले आहे. तसेच हा चित्रपट 14 ऑगस्ट, 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. तसेच त्याच दरम्यान बॉक्स ऑफिसवर त्याची थेट स्पर्धा सनी देओलच्या बहुप्रतिक्षित ‘बटवारा १९४७’ या चित्रपटाशी होणार आहे.
चित्रपटाचे निर्माते, विशेष भट्ट यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “अवारपन २” हा केवळ एक सिक्वेल नाही, तर अनेक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रवासाचा विस्तार आहे. तसेच आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर आहेत.
हेही वाचा
शिवांगीला मागे टाकत श्रेया कालराने जिंकली ‘लॉक अप 2’ची ट्रॉफी










