[rank_math_breadcrumb]

रणबीर कपूर, अरुण गोविल यांच्या आधी या अभिनेत्याने 9 वेळा साकारली प्रभू रामांची भूमिका

रामायण हा एक बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात प्रभू रामाची भुमिका अभिनेता रणबीर कपूर करत आहे. तर या आधी 1987 च्या काळात पाहायचे झाल्यास रामाच्या भुमिकेला अजरामर करणारे अभिनेते म्हणजे अरुण गोविल होते. तसेच प्रेम अदिब यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमधुन प्रभु रामाची भुमिका साकारली आहे. त्यांनी हे पात्र इतके उत्तम निभावले की प्रेक्षक दुसऱ्या कोणत्याही भुमिकेत पाहण्याची कल्पनाही करु शकले नाहीत. 

प्रेम अदिब यांचा रामाची भुमिका करण्याचा प्रवास 1942 पासुन ‘भारत मिलाप’ या चित्रपटाने सुरू झाला. आणि यांचे दिग्दर्शक विजय भट्ट याने केली होते. या चित्रपटातील त्यांच्या सौम्य आणि शांत अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच्या या भुमिकेनंतर त्यानंतर त्याना अनेक कामे मिळाली. तर विजय भट्ट यांनी पुढच्याच वर्षी, 19943 मध्ये, त्यांना ‘रामराज्य’ मध्ये पुन्हा संधी दिली. हा चित्रपट देखील प्रंचड गाजला.

प्रेम अदीब यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक धार्मिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी रामबाण, राम विवाह, रामनवमी,’राम हनुमान युद्ध’, ‘राम लक्ष्मण’, ‘राम भक्त विभीषण’ आणि 1954 च्या ‘रामायण’ या चित्रपटांमध्ये प्रभू रामाची भूमिका साकारली. तसेच . 1940 च्या दशकापासून ते 1950 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, प्रेम अदीब आणि शोभना समर्थ यांची ‘राम-सीता’ म्हणून असलेली जोडी इतकी लोकप्रिय झाली की, लोक कॅलेंडर आणि धार्मिक मासिकांमधून त्यांची छायाचित्रे कापून पूजेसाठी आपल्या घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये ठेवू लागले.

प्रेम अदीब यांचे 25 डिसेंबर 1959 रोजी, वयाच्या 42 व्या वर्षी, मेंदूच्या रक्तस्रावामुळे अकाली निधन झाले. प्रेम अदीब आता आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या भुमिका आजही आपल्यात जिंवत आहेत.

हेही वाचा

शिवांगीला मागे टाकत श्रेया कालराने जिंकली ‘लॉक अप 2’ची ट्रॉफी