सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहादरम्यान, मुंबईत लालबागच्या राजाला अनेक भक्त, कलाकार भेट देत आहेत. नुकतेच शाहरुख खान, संजय दत्त आणि रणवीर सिंग यांच्यासह अनेक कलाकारांनी मंदिराला भेट दिली आहे. तर आता नुकतेच गोविंदा आणि कोमल राणी या नुकतेच मंदिराला भेट दिली आहे. तर कोमल राणी पुन्हा एकदा अभिनेता गोंविदा सोबत दिसल्याने चर्चा रंगली आहे.
मंगळवारी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी लालबागच्या राजाच्या मंडपाला भेट दिली आहे. तसेच अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरही त्याच्यासोबत होती. तर या वेळी गोविंदाने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता तर कोमलने सुंदर लाल कलरची साडी परिधान केली होती. दोघांनीही बाप्पाचे आर्शीवाद घेतले आणि त्यानंतर त्यांनी तेथील पापराझी आणि माध्यमांचे स्वागत केले. त्या दोघांच्या एकत्र भेटीचे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा एकदा पुन्हा एकदा अभिनेत्याचे आयुष्य चर्चेत येत आहे.
गेल्या काही काळापासून गोविंदा (govinda)आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल विविध बातम्या समोर येत आहेत. सुनीता अहुजाने मध्यंतरी राखी सांवत सोबत फोनवर बोलताना म्हणले होते की, गोंविदा आणि कोमल हे लग्न करणार होते आणि त्या मी तलाख देत नाहीय.
अभिनेता गोंविदाची पत्नी सुनीता आहुजा देखील त्याच मंडपात पोहोचली होती. तिनेही बाप्पाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. परिणामी, एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी लालबागच्या राजाच्या दरबारात त्यांचे आगमन चर्चेचा विषय बनले आहे.
हेही वाचा
प्रभासचा फौजी पुढे का ढकलण्यात आला? निर्मात्यांकडून मोठी माहिती समोर


